शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सातारा परिसरात रस्ते बनविण्याऐवजी खडी उचलण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:09 IST

सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.

औरंगाबाद : सातारा परिसरातील रस्त्याची कामे मनपाकडून तीन वर्षांपासून सुरू आहेत. नागरिकांनी आवाज उठविल्यावर ठेकेदार व अधिकारी थोड्या फार हालचाली करतात; परंतु आता तर रस्त्यावर टाकलेली खडी ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रकार तलाठी कार्यालयासमोरील रस्त्यावर घडल्याने नागरिकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.बायपासपासून ते अंतर्गत रस्त्यांवर खडी टाकून रस्ता तयार करण्याचे काम अगदी कासवगतीने सुरू आहे. रस्ता तयार होत असल्याने नागरिकांनीही अडचणीतून येणे-जाणे सहन केले आहे; परंतु रस्त्याला पूर्णत्वाकडे नेण्याऐवजी त्यावर टाकलेली खडीच ठेकेदाराने मजुरांमार्फत उचलून नेण्याचा अफलातून प्रकार समोर आला. नागरिकांनी खडी उचलून नेण्यास प्रचंड विरोध करीत मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पावसाळ्यापूर्वी तरी रस्ता पूर्ण करावा, अशी अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. संघर्ष केल्याशिवाय नागरिकांना कोणतीच सेवा-सुविधा देण्यात येत नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचा सूर आहे.रेणुकामाता कमान, एमआयटी रस्ता, आमदार रोड, सुधाकरनगर रोड, आयप्पा मंदिरामागील अलोकनगरात जाणाºया रस्त्यावरही तीच अवस्था आहे. सर्वच रस्ते अपूर्ण अवस्थेत सोडले असून, रस्त्यावर टाकलेली खडीची दबाई करण्याऐवजी ती उचलून नेली जात असल्याने संताप व्यक्त होतो आहे.नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकू नकारस्ते तयार करण्याऐवजी खडी उचलून नेणाºयावर मनपाने गुन्हे दाखल करावेत, विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या डोळ्यात धूळ झोकू नका.-अरुण पाटीलअपूर्ण रस्ते त्वरित पूर्ण करासातारा-देवळाईतील रस्त्यांच्या रेंगाळलेल्या कामाकडे मनपाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी तरी रस्ते पूर्ण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.-शेखर म्हस्के 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा