शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प्रेरणादायी क्रांती चौक ! १९८३ साली उभारण्यात आला होता शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 14:08 IST

शिवजयंती विशेष: क्रांती चौकात २१ मे १९८३ रोजी मुंबईहून आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला होता. 

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शहरातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे २१ मे १९८३ रोजी क्रांती चौकात अनावरण झाले होते. शिवरायांच्या या पुतळ्याने ३५ वर्षे शहरवासीयांना प्रेरणा दिली. या पुतळ्याकडे पाहून प्रत्येकाच्या अंगात स्फूर्ती निर्माण होत असे. नवीन पुतळा बसविण्यासाठी मार्च २०१८ मध्ये जुना पुतळा सन्मानपूर्वक काढण्यात आला. आता त्या जागी छत्रपतींचा दुसरा नवीन अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या निमित्ताने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पहिल्या पुतळा अनावरणाचा तो ऐतिहासिक क्षण आठवला.

पहिल्या पुतळ्यासाठी २१ वर्षाचा लढाक्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण १९८३ मध्ये झाले असले तरीही तो उभारण्यासाठी १९६२ पासून प्रयत्न सुरू होते. १९८१ मध्ये तत्कालीन ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे कार्य जि. प. व नगरपालिकेने संयुक्तपणे हाती घ्यावे, असे ठरले होते. ही पुतळा उभारण्यासाठीची पहिली बैठक ठरली.

पहिल्या समितीचे अध्यक्ष ठरले अलफखाँअश्वारुढ शिवछत्रपती सर्वपक्षीय पुतळा समितीची स्थापना १९८१ मध्ये करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष अलफखाँ हे होते. सचिव अरुण मुगदिया, समितीमध्ये केशवराव औताडे, साहेबराव पाटील डोणगावकर, प्रकाश मुगदिया, पृथ्वीराज पवार, अशोक शहा आदींचा समावेश होता.

पहिल्या पुतळ्याविषयी १) मुंबईतील शिल्पकार एस.डी. साठे यांनी क्रांती चौकातील महाराजांचा पहिला अश्वारुढ पुतळा तयार केला. २) शिवरायांचा आधीचा पुतळा १५ फूट उंच ५ फूट रुंदीचा होता. ३) मुंबईहून ट्रकने ९ मे १९८३ रोजी शहरात पुतळा आणण्यात आला. ४) २१ मे १९८३ रोजी अनावरण झाले होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज