औरंगाबाद : गोमटेश मार्केट परिसरातील औषधी भवन येथील नाल्याच्या प्रकरणात महापालिका मागील एक ते दीड महिन्यापासून अत्यंत सावध भूमिका घेत आहे. मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सूचनेनुसार मंगळवारी महापालिकेच्या पथकाने औषधी भवनसह इतर इमारतींच्या बांधकामाची तपासणी केली. इमारत उभारणीत अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचे पथकास निदर्शनास आले. उद्या बुधवारपासून नाल्यातील गाळ काढण्याची मोहीम सुरू होत आहे.शहरात मोठा पाऊस झाल्यास दलालवाडी, गांधीनगर आदी भागातील नागरिकांच्या घरांमध्ये कंबरेएवढे पाणी साचते.
औषधी भवनसह इतर इमारतींची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 00:29 IST