शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित निधीबाबत जि.प.मध्ये चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 01:07 IST

जलसंधारणाच्या कामांसाठी प्राप्त झालेला ७ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जलसंधारणाच्या कामांसाठी प्राप्त झालेला ७ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला. सदरील अखर्चित निधी शासनाकडे परत करण्याऐवजी जिल्हा परिषदेने तो ३१ मार्च रोजीच लघुपाटबंधारे विभागाकडे वर्ग केला. निधी वर्ग करण्याची संपूर्ण कार्यवाही ही बनावट इतिवृत्ताद्वारे करण्यात आल्याचा आरोप होताच या प्रकरणाची विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेतली. तथापि, सध्या आयुक्त कार्यालयामार्फत यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली आहे.दोन महिन्यांपूर्वी अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड यांंनी स्थायी समितीच्या बैठकीत ७ कोटी रुपयांच्या निधीवरून सभागृहाला धारेवर धरले होते. याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बेदमुथा, जि. प. सिंचन विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता पांढरे, तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांच्यावर गैरव्यवहाराचेहीआरोप करण्यात आले होते. जि. प. जलसंधारण समितीच्या बैठकीत प्राप्त ७ कोटी रुपयांचा अखर्चित निधी लघु पाटबंधारे कार्यालयाकडे वर्ग करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला, असे बैठकीचे बनावट इतिवृत्त करण्यात आले.दरम्यान, मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा याच मुद्यावर सुरेश सोनवणे, विजय चव्हाण, एल. जी. गायकवाड, अविनाश गलांडे, किशोर बलांडे, बांधकाम सभापती विलास भुमरे, जि. प. उपाध्यक्ष केशव तायडे आदींनी प्रशासनाला जाब विचारला. ७ कोटी रुपये अखर्चित राहिले, तर ते शासनाकडे परत करण्याची जबाबदारी सिंचन विभागाची होती. परंतु अखर्चित निधी शासनाकडे परत न करता तो परस्पर लघु पाटबंधारे विभागाकडे कोणत्या आधारे वर्ग केला. यासाठी सर्वसाधारण सभा, स्थायी समिती अथवा विषय समितीची पूर्व परवानगी का घेण्यात आली नाही, असा या सदस्य- पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. जि. प. सिंचन विभागाने ३१ मार्च २०१७ रोजी सकाळी ३ कोटी रुपये व दुपारी १ कोटी रुपये, तर उर्वरित ३ कोटी १७ जून २०१७ रोजी लघु पाटबंधारे विभागाकडे वर्ग केला. यासंदर्भात तयार करण्यात आलेले जलसंधारण विभागाचे इतिवृत्त बनावट आहे, याची चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याचा आग्रह सदस्यांनी धरला.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी