शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बसफेऱ्यांची माहिती आमदारांना!

By admin | Updated: July 21, 2016 01:06 IST

जालना : आपल्या मतदार संघात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या किती फेऱ्या आहेत, याची माहिती आता आमदारांना दिली जाणार आहे.

जालना : आपल्या मतदार संघात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या किती फेऱ्या आहेत, याची माहिती आता आमदारांना दिली जाणार आहे. सार्वजनिक उपक्रम समितीच्या सूचनेनुसार मध्यवर्ती कार्यालयाने हा निर्णय घेतला आहे. ही माहिती अ, ब आणि क असे वर्गीकरण करून दिली जात आहे.राज्य परिवहन महामंडळाला सूचना देण्यासाठी २०१५-१६ साठी राज्य स्तरावर सार्वजनिक उपक्रम समिती स्थापन करण्यात आलेली आहे. विधानसभा सदस्य डॉ. सुनील देशमुख हे या समितीचे प्रमुख असून सदस्य म्हणून विविध मतदार संघातील २५ सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या म्हणण्यानुसार मध्यवर्ती कार्यालयाने प्रत्येक विभागाला बसफेऱ्यांची माहिती काढण्यास सांगितले आहे. ही माहिती आपल्या विभागातील सर्व आमदारांना द्यावी, असे परिपत्रक १५ जुलै रोजी कार्याललयाला प्राप्त झाले असून त्यानुसार एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ पर्यंतची माहिती काढण्यात आल्याचे वाहतूक निरीक्षक आशोक आघाव यांनी सांगितले.अनेकवेळा आमदार हे नागरिकांच्या मागणीनुसार बसफेऱ्या वाढविण्यास सांगतात. परंतु बसफेऱ्या सुरू केल्यानंतर त्यातून महामंडळाला तोटा होईल की, फायदा हे त्यांना माहिती नसते.तसेच या भागातून किती प्रवासी बसने प्रवास करतात, याची माहिती नसते. हे समजण्यासाठी महामंडळाने अ, ब आणि क असे वर्गीकरण करून बसफेऱ्यांची माहिती दिली आहे. उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न आणणाऱ्या बसफेऱ्या ‘अ’ गटात घेतल्या असून न परवडनाऱ्या परंतु प्रवाशांसाठी सुरू असलेल्या बसफेऱ्या ‘क’ मध्ये घेण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)४बसेस सुरू करा, बसफेऱ्या वाढवा अशा मागण्या घेऊन कार्यकर्ते व नागरिक हे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांकडे जातात. त्यानंतर आमदार रापमला सूचना देतात. परंतु सदरील मार्गावर बसफेरी सुरू केल्यावर त्या पासून तोटा होण्याची शक्यता असते, म्हणून अधिकारी तसदी घेत नाहीत. यावरून मग वाद निर्माण होतात. परंतु आता ही माहिती आमदारांना दिल्याने या वादाला काहीप्रमाणात आळा बसल्याशिवाय राहणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.वर्षभरात १५ हजार बसफेऱ्या४एका वर्षात जालना विभागातील चार आगारांमधून १५ हजार ३७७ बसफेऱ्या धावल्या आहेत. अ मध्ये ४ हजार ५१२, ब मध्ये ८ हजार ४८९ तर क मध्ये २ हजार ३७६ बसफेऱ्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.