शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राख्यांवर शिवलिंग, त्रिशूल, डमरू; यंदाच्या रक्षाबंधनावर महाशिवपुराणचा प्रभाव

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 28, 2023 12:03 IST

बाजारात दोन हजारपेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : पं. प्रदीप मिश्रा यांनी ‘महाशिवपुराण’ची महती घराघरात पोहोचविली आहे. यामुळे मागील तीन ते चार वर्षांत महादेवाची भक्ती करणाऱ्यांची संख्या लाखोंने वाढली आहे. याची प्रचिती शहरातील ११७ शिव मंदिरांतील गर्दीने लक्षात येते. त्यात आता नीज श्रावण महिना सुरू आहे अन् राखीपौर्णिमा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. आपल्या लाडक्या भाऊरायासाठी बहिणीही भगवान शंकर, शिवलिंग, रुद्राक्ष असेलल्या राख्यांना पसंती देत आहेत, हे बाजारात फेरफटका मारल्यावर दिसून येते.

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला आणखी दृढ करणारा सण ‘राखीपौर्णिमा’. भावाच्या मनगटावर स्नेहाचा धागा बांधून बहीण रक्षणाची हमी घेते. यानिमित्त बाजारात दोन हजारपेक्षा अधिक डिझाइनच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. त्यात यंदा शिवलिंग, महाकाल, त्रिशूल, डमरूचे पेंडल असलेल्या राख्यांना बहिणी आवर्जून खरेदी करत आहेत. याशिवाय बालगणेश, बाळकृष्ण, राधा-कृष्ण या राख्यांनाही पसंती दिली जात आहे.

रविवारी सायंकाळी राख्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. तासनतास दुकानात थांबून आपल्या लाडक्या भाऊरायासाठी युनिक राखी खरेदी केली जात होती.

डायमंड, चांदीच्या राख्याबाजारात डायमंड, चांदीच्या राख्याही विक्रीला आल्या आहेत. चांदीच्या राख्या राजकोटहून आणण्यात आल्या आहेत. त्यांची ८० ते १५० रुपये दरम्यान विक्री होत आहे. तसेच चांदी, डायमंड असलेल्या राख्या ६०० ती १२०० रुपये दरम्यान मिळत आहेत. ९२.५ प्रीमियम सिल्व्हर रेंज म्हणून या राख्यांना ओळखले जात आहे.

देव राख्या झाल्या डिझायनरदेव राखी म्हटली की केशरी, पिवळा, गुलाबी रेशीम, लोकरचा धागा. देवघरातील देवांना या राख्या आवर्जून बांधल्या जातात. तसेच वाहन, तिजोरीलाही याच राख्या बांधतात. आता या राख्यांवर चमकती टिकली, मोती, डिझाइन वर्क लावून आकर्षक बनविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनAurangabadऔरंगाबाद