शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अपात्र निविदा ठरली पात्र

By admin | Updated: September 7, 2016 00:38 IST

नजीर शेख , औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा रक्षक भरतीमध्ये अपात्र असलेली ‘एसएमके’ ग्लोबल सिक्युरिटी सोल्युशन या कंपनीची निविदा पात्र करण्यात आल्याचे समोर आले आहे.

नजीर शेख , औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुरक्षा रक्षक भरतीमध्ये अपात्र असलेली ‘एसएमके’ ग्लोबल सिक्युरिटी सोल्युशन या कंपनीची निविदा पात्र करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यापीठाने सुरक्षा रक्षक भरतीसाठी जून २०१५ मध्ये काढलेल्या निविदेत काही अटीशर्ती ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये निविदाधारक त्यांच्या सुरक्षा रक्षकांना किमान वेतन कायदा अधिनियमाप्रमाणे वेतन अदा करण्यास बांधिल राहील, अशी १३ क्रमांकाची अट होती. अट क्रमांक १७ मध्ये निविदाधारकाने कमीत कमी वेतन कायद्यापेक्षा कमी दराने निविदा पाठविल्यास ती अपात्र ठरविण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. ‘एसएमके’ च्या कंत्राटदाराने विद्यापीठाला सादर केलेली निविदेची प्रत आणि विद्यापीठाने निविदा उघडतानाची तयार केलेली यादी (चेकलिस्ट) ‘लोकमत’ला प्राप्त झाली असून यामध्ये ‘एसएमके’ एका सुरक्षारक्षकाचे मासिक एकूण वेतन हे ९२९० रुपये नमूद केले आहे. ते किमान वेतन कायद्यानुसार ११ हजार ४५० रुपये हवे होते. मात्र ‘एसएमके’च्या कंत्राटदाराने सेवाशर्तीचा भंग करूनही त्यांची निविदा अपात्र न ठरवता विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी ती पात्र ठरविलीच. शिवाय ‘एसएमके’लाच कंत्राट बहाल केले. निविदेतील अटीशर्र्तींचा भंग करूनही ‘एसएमके’ला कंत्राट कसे मिळाले, यामध्ये मोठा ‘अर्थ’ दडल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यापीठाचे मतदरम्यान, मंगळवारी सुरक्षा रक्षक भरती प्रकरणातील घोटाळ्यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच विद्यापीठात खळबळ माजली. विद्यापीठ प्रशासनातर्फे या वृत्तासंदर्भात स्पष्टीकरण देणारे पत्रही देण्यात आले. यामध्ये कोणत्याही मंत्र्यांनी कुलगुरूंना तोंडी अथवा लेखी संपर्क साधलेला नाही, असे म्हटले आहे. लोएस्ट वनप्रमाणे कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. निविदाधारकाने ट्रेनिंग सेंटर असल्याचे विद्यापीठाला लेखी दिले आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची डील केली नसल्याचेही या पत्रात म्हटले आहे. मात्र किमान वेतन कायद्यातील अधिनियमांचा भंग झाला किंवा नाही, याबाबत काहीच म्हणण्यात आले नाही. विद्यापीठात सुरक्षा रक्षक भरतीचे कंत्राट देताना ‘एसएमके’ ग्लोबल सिक्युरिटी सोल्युशनने किमान वेतन कायदा अधिनियमांचा भंग केल्याची तक्रार निविदा भरलेल्या आयएसएफ सर्व्हिसेस या कंत्राटदाराने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे केली आहे.४ कामगार पुरवठा करण्यासाठी लायसन्स देण्याचा अधिकार शहरी भागात पोलीस आयुक्तांना आहे. त्यामुळे ही तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, ‘एसएमके’ कंपनीने भरलेली निविदा ही कामगार कायदा अधिनियम १९४८ नुसार बेकायदा कृत्य ठरते. त्यामुळे ‘एसएमके’चा परवाना रद्द होऊ शकतो. या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. विद्यापीठाचा पैसा लुटणाऱ्या अनेक टोळ्याच सध्या विद्यापीठात कार्यरत असल्याचे दिसते. ‘एसएमके’ प्रकरणात विद्यापीठावर अधिकचा सुमारे ३६ लाख रुपयांचा बोजा पडला आहे. या प्रकाराला विद्यापीठातील व्यवस्थाही जबाबदार आहे. उस्मानाबाद येथील विद्यापीठाच्या उपकेंद्रातही काही सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असून त्यापोटीही विद्यापीठ महिना सुमारे दीड लाखांचे बिल भरत आहे.