शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहराला हवाय इंदौर पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. ...

ठळक मुद्देडोअर टू डोअर कलेक्शन हवे : ठिकठिकाणी कच-यावर यशस्वी प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत इंदौर शहराने अवघ्या काही महिन्यांमध्ये कठोर परिश्रम घेऊन अव्वल क्रमांक पटकावला. इंदौर महापालिकेतर्फे प्रत्येक घरातून, दुकानातून दोन वेळा कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे, ठिकठिकाणी प्रक्रियाही यशस्वीपणे करण्यात येते. याच इंदौर पॅटर्नची औरंगाबाद शहराला आज नितांत गरज आहे. जोपर्यंत महापालिका स्वत: या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करीत नाही, तोपर्यंत शहरातील कचºयाचा प्रश्न सुटणार नाही, हे निश्चित.मध्यप्रदेशच्या इंदौर शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या आसपास आहे. येथील कचºयाचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. डोअर टू डोअर कलेक्शन करताना ओला व सुका कचºयाचे शंभर टक्के वर्गीकरण करण्यात येते.३५० रिक्षांवर सकाळी आणि सायंकाळी दोन वेगवेगळी गाणी वाजविण्यात येतात. हे गाणे ऐकून प्रत्येक घरातील महिला, आबालवृद्ध कचरा आणून टाकतात. जमा झालेला कचरा नेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा महापालिकेने उभारली आहे. प्रक्रिया केंद्रावर हा कचरा नेऊन शंभर टक्के प्रक्रियाही करण्यात येते. रस्त्यावर, चौकात, दुभाजकात कचरा टाकल्यास पाचशे रुपये दंडही आकारण्यात येतो.कचराकुंडी ही संकल्पनाच महापालिकेने ठेवलेली नाही. व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी दोन वेळा कचरा उचलण्यात येत असल्याने नागरिकही आनंदी आहेत. शहरात कुठेच घाण, कचरा दिसून येत नाही. मागील सहा महिन्यांपासून महापालिकेला कचरा प्रश्न भेडसावत आहे. आता हा प्रश्न गंभीर वळणावर येऊन ठेपला असून, २३ दिवसांपासून शहरात १० हजारांहून अधिक मेट्रिक टन कचरा पडून आहे.शेकडो प्रयत्न केले तरी महापालिकेला कचरा उचलण्यात यश आलेले नाही. आणखी काही दिवसांमध्ये कचरा उचलण्याची कोणतीही शाश्वती नाही. चार दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दोन दिवसांमध्ये संपूर्ण कचरा उचलण्यात येईल, असा दावा सर्वसाधारण सभेत केला. हा दावा आतापर्यंतच्या अनेक दाव्यांप्रमाणे फोल ठरला.जनजागृतीचा प्रचंड अभाववर्षानुवर्षे नागरिकांना पडलेल्या सवयीनुसार आजही विविध चौकांमध्ये गल्लीतील कोपºयावर, सोसायटीच्या बाहेर कचरा आणून टाकण्यात येतो. ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सवय असंख्य नागरिकांना नाही. नागरिकांमध्ये अगोदर जनजागृती करण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे.शहरात साडेतीन लाख मालमत्ताऔरंगाबाद मनपा हद्दीत किमान साडेतीन ते चार लाख मालमत्ता असतील, असा अंदाज आहे. प्रत्येक घरातून कचरा उचलणे म्हणजे मनपासाठी इंद्रधनुष्य उचलण्यासारखाच प्रकार आहे. मनपाकडे सध्या तरी यासंदर्भात कोणतीच तयारी नाही. काही चांगले करण्याची इच्छाशक्तीही नाही.