शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
2
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
3
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
4
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
5
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा
6
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
7
घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
8
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
9
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
10
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
11
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
12
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
13
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
14
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
15
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
16
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
17
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
18
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
19
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
20
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या

इंडियन जिम्नॅस्टिक लीगमध्ये औरंगाबादच्या रिद्धी, सिद्धी उमटवणार ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 22:56 IST

: औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी आणि सिद्दी हत्तेकर या दोन उदयोेन्मुख खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला आहे. आता हे दोन्ही खेळाडू भारतात प्रथमच होणाºया ‘इंडियन जिम्नॅस्टिक लीग’मध्येही आपले कौशल्य सादर करणार आहेत.

औरंगाबाद : औरंगाबादच्या प्रतिभावान खेळाडू रिद्धी आणि सिद्दी हत्तेकर या दोन उदयोेन्मुख खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपला विशेष ठसा उमटवला आहे. आता हे दोन्ही खेळाडू भारतात प्रथमच होणाºया ‘इंडियन जिम्नॅस्टिक लीग’मध्येही आपले कौशल्य सादर करणार आहेत.एमएसएम आणि साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव करणाºया रिद्धी आणि सिद्धी प्रवीण हत्तेकर या जुळ्या बहिणी १ ते ३ डिसेंबर मुंबई येथे होणाºया इंडियन जिम्नॅस्टिक लीगमध्ये त्यांची निवड झाली आहे. या लीगसाठी निवड होणाºया या दोन्ही खेळाडू मराठवाड्याच्या पहिल्याच जिम्नॅस्ट ठरल्या आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल आणि भारतीय नौदलाच्या खेळाडूंचा प्रामुख्याने सहभाग राहणार आहे. चार संघांमध्ये होणाºया या स्पर्धेत रिद्धी ही टिष्ट्वस्टर्स, तर सिद्धी ही स्विंगर्स संघांमधून ज्युनिअर गटात प्रतिनिधित्व करणार आहे. सध्या त्या रामकृष्ण लोखंडे, तनुजा गाढवे, वीरेंद्र भांडारकर यांच्या निगराणीत सराव करीत आहेत. बॅलेन्स बीम, टम्बलिंग, रोमन रिंग, वॉल्ट, अनइव्हन बार, हाय बार, बॅलेन्स बीम आदी प्रकारच्या अप्रॅटसवर ही स्पर्धा होणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबादेत झालेल्या राज्य जिम्नॅस्टिक स्पर्धेत त्यांनी आपली पताका उंच धरत पदकांची कमाई केली होती. ज्युनिअर गटाच्या आपल्या कामगिरीचा झंझावात कायम ठेवत त्यांनी कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक जिंकत यश मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर त्यांची जिम्नॅस्टिक स्पर्धेत आपली जागा पक्की केली.लीगसाठी सुरू आहे कसून सरावरिद्धी आणि सिद्धी हत्तेकर या भगिनी औरंगाबादच्या जिम्नॅस्टिक खेळात कायमच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर पदके जिंकली आहेत. फ्लोअर आणि बीम एक्सरसाइजवर या भगिनींची चांगली पकड असून, हे अपॅरटस त्यांच्या जमेची बाजू आहेत. दिवसाच्या सुरुवातील आणि सूर्यास्ताला किमान पाच ते सहा तास सराव त्या करीत आहेत.आगामी वर्षांत रिद्धी, सिद्धी भारताचे प्रतिनिधित्व करतीलरिद्धी व सिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणी तब्बल आठ ते दहा वर्षांपासून जिम्नॅस्टिकमध्ये सराव करीत आहेत. शरीराची तयारी व मूलभूत कौशल्य तांत्रिकदृष्ट्या जेवढे अचूक करण्यावर लक्ष द्याल तेवढी कामगिरी उंचावते आणि या दोघींच्या बाबतीतही हेच घडत आहे. आता त्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळत आहे आणि आता चांगले प्रशिक्षकही मिळत आहेत. आगामी दोन ते तीन वर्षांत त्या भारतीय संघात स्थान मिळवतील, असा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, आंतरराष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक डॉ. मकरंद जोशी यांनी व्यक्त केली.