शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयातील तासिका प्राध्यापकांना मिळणार वाढीव वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 17:55 IST

राज्य सरकारने महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद : राज्य सरकारनेमहाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला. मात्र, नोव्हेंबरपर्यंतचे वेतन जुन्या नियमानेच देण्यात येणार आहे. सुधारित वेतनाचा नियम १ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे उच्चशिक्षण विभागातून सांगण्यात आले.

शासनाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या वेतनवाढीचा निर्णय घेतला आहे. पूर्वी या प्राध्यापकांना प्रतितास ३०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यात वाढ करून ५०० रुपये करण्याचा निर्णय ५ नोव्हेंबर रोजी शासन निर्णयाद्वारे घेतला आहे. मात्र, हा निर्णय १ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले. उच्चशिक्षण विभागाच्या विभागीय कार्यालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंतचे वेतन जुन्या नियमानुसार केले जाणार आहे. त्या वेतनाला मान्यता घेण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापकांच्या तासिकांचे हे प्रस्ताव ३० नोव्हेंबरपर्यंतच पाठवावेत, असेही या आदेशात म्हटले आहे.

तासिका तत्त्वाच्या वेतनवाढीतही फसवलेविविध प्राध्यापक, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या संघटनांनी किमान ३० हजार रुपयांपर्यंत तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना वेतन देण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाने ही मागणी तर मान्य केलीच नाही. उलट ३०० रुपयांवरून ५०० रुपये वाढ केली. तरीही या प्राध्यापकांचे मानधन १५ हजार रुपयांपेक्षा अधिक होत नाही. वेतनवाढीतही शासनाने फसवले. त्यानंतर किमान चालू शैक्षणिक वर्षापासून ही वेतनवाढ लागू होण्याची आशा होती. आता ती आशाही मावळली आहे. शासकीय कर्मचारी, अधिकारी, पूर्णवेळ प्राध्यापकांना कोणतीही वाढ केली, तर ती चालू शैक्षणिक वर्षापासून लागू होते. मात्र, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या वेतनवाढीत शासन निर्णयापासून आगाऊ वेतन अदा करण्याचे आदेश दिले. त्यातही शासनाने फसवले असल्याचा आरोप नव प्राध्यापक संघटनेचे प्रा. श्रीराम फरताडे यांनी केला.

टॅग्स :Professorप्राध्यापकState Governmentराज्य सरकारMONEYपैसाcollegeमहाविद्यालय