बीड : आकाशात दाटून आलेले ढग, जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट अशा पावसाळी वातावरणात शनिवारी बरसलेल्या अवकाळीने अक्षरश: दाणदाण उडविली. ठिकठिकाणी गारांचा खच पडला होता. झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. काही भागांत घरावरील पत्रे उडाली तर काही ठिकाणी विद्युततारा तुटल्याने पुरवठा विस्कळीत झाला. पावसाळा कोरडाठाक गेल्याने दुष्काळी झळा सोसणाऱ्या बीडकरांनी पुन्हा एकदा निसर्गाची अवकृपा अनुभवली.सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते. दुपारी दोन वाजताच शहरात काळोख पसरला होता. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. वादळीवाऱ्यासह सर्वदूर पाऊस झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. रस्ते जलमय झाले, नाले तुडूंबा भरुन वाहिले. शेत शिवारांमध्ये देखील सखोल ठिकाणी पाणी साचले होते. विद्युततारा तुटल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे पाणीपुरवठा देखील विस्कळीत झाला.अंबाजोगाईत पाणीपुरवठा ठप्पशहराला धनेगाव येथील मांजरा धरणातून पाणीपुरवठा होतो. आधीच टंचाईमुळे नागरिक हैराण आहेत. त्यात अवकाळी पावसानंतर तुटलेल्या विद्युत तारांमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. दोन दिवसांपासून विद्युतपंप बंद आहेत.नद्यांचे पांग फेडलेपरळी तालुक्यातील हिवरा, गुणवती या नद्यांना पाणी आले नव्हते. अवकाळीने मात्र नद्या धो-धो वाहिल्या. त्यामुळे पांग फिटले आहेत.गेवराई, केज, माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. शिरूर, आष्टी, धारूर, पाटोदा येथे मात्र रिमझिम पाऊस बरसला. (ठिकठिकाणीच्या प्रतिनिधींकडून)
अवकाळीने दाणादाण !ं
By admin | Updated: April 12, 2015 00:43 IST