लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील नोंदणी शुल्कात सोमवारपासून (दि.१) वाढ करण्यात येणार आहे. ओपीडी शुल्क वाढीने नववर्षाची सुरुवात होणार असून, चार दिवसांनंतर इतर वैद्यकीय सेवांच्या शुल्कात वाढ केली जाणार आहे. त्यासाठी संगणकीय प्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.बाह्यरुग्ण विभागात आतापर्यंत नोंदणी शुल्क १० रुपये आकारण्यात येत होते. आता हे शुल्क २० रुपये होईल. गेल्या काही वर्षांत वाढलेली महागाई आणि अन्य गोष्टींचा विचार करून घाटी रुग्णालयात देण्यात येणाºया सेवांच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुल्कवाढीसंदर्भात ‘जीआर’ आलेला आहे.यानुसार विविध वैद्यकीय शुल्कांत जवळपास ३० टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. घाटी रुग्णालयात नवे शुल्क निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन क रण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून शुल्कवाढीसंदर्भात प्रत्येक विभागाला माहिती देऊन दर निश्चित करण्यात आले. ‘ओपीडी’सह आंतररुग्ण शुल्क, एक्स-रे, सोनोग्राफी, कलर डॉपलर, छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया, अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी आदी वैद्यकीय सेवांचे शुल्कही वाढणार आहे. अन्य वाढीव शुल्कांची तीन ते चार दिवसांमध्ये घाटीत अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे समजते.आजपासून अंमलबजावणीओपीडी नोंदणी शुल्क वाढीची १ जानेवारीपासून अंमलबजावणी केली जाईल. इतर शुल्कात चार दिवसांनंतर वाढ केली जाणार आहे, अशी माहिती घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भारत सोनवणे यांनी दिली.
घाटीमध्ये ओपीडी शुल्कात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:15 IST