हिंगोली : जिल्ह्यातील अनेकांना दाम दुप्पट रकमेचे आमिष दाखवून लाखों रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ‘सुपर पॉवर इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग इंडिया प्रा.लि. कंपनी’ च्या दोन्ही संचालकांच्या पोलीस कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ झाली आहे. औरंगाबाद पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी दीपक केडू पारखे, दिव्या दीपक पारखे या दोघांना मागील आठवड्यात हिंगोली पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी वाढविण्यात आली असल्याची माहिती बासंबा ठाण्याचे सपोनि सुधाकर आडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
दोन्ही आरोपींच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: September 14, 2014 23:36 IST