शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जिल्ह्यात ६५५ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:03 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ६५५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,२४७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या ...

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ६५५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,२४७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २४ आणि अन्य जिल्ह्यांतील ८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७,४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजार २४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २२ हजार ७७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २१४, तर ग्रामीण भागातील ४४१ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६०७ आणि ग्रामीण भागातील ६४० अशा १,२४७ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वाळूज येथील ३६ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ३५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ५५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ९० वर्षीय महिला, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ४६ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६४ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७० वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६५ वर्षीय महिला, शंकरपूर, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, पळशीतील ६१ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ३७ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ५३ वर्षीय पुरुष, रांजणगाव, पैठण येथील ४५ वर्षीय महिला, कन्नड येथील ३६ वर्षीय पुरुष, एन-४ येथील ९० वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ३९ वर्षीय पुरुष, मयूरपार्क येथील ८५ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ६० वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ६७ वर्षीय पुरुष, भीमनगर येथील ५२ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५५ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, ७२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ८० वर्षीय महिला, ६६ वर्षीय महिला, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद २, सातारा परिसर ८, बीड बायपास ७, गारखेडा ५, शिवाजीनगर ५, घाटी ५, पीर बाजार १, पडेगाव ३, नारेगाव २, बालेवाडी १, खाराकुंआ १, पैठण गेट १, पुंडलिकनगर ५, हनुमाननगर १, गजानननगर १, जवाहर कॉलनी २, न्यायनगर २, राजनगर १, गुरुदत्तनगर १, कॅनॉट २, एन-४ येथे ४, लक्ष्मीनगर, जटवाडा रोड १, एन-२ येथे १, मुकुंदवाडी ६, रामनगर १, स्वराजनगर १, जयभवानीनगर २, एन-१ येथे १, एन-८ येथे २, राधास्वामी कॉलनी २, चेतनानगर, हर्सूल १, गुरुचरण रेसिडेन्सी १, जाधववाडी १, राजे संभाजीनगर १, एकतानगर १, मयूर पार्क ३, एन-६ येथे १, चाटे स्कूल १, लक्ष्मी कॉलनी २, पेशवेनगर ३, देवळाई परिसर ४, श्रेयनगर २, दिशानगरी १, कांचनवाडी २, नक्षत्रपार्क १, आंबेडकरनगर १, काला दरवाजा १, एन-१२ येथे १, शिवशंकर कॉलनी १, श्रेयनगर २, देवानगरी १, चिकलठाणा १, छावणी ३, एन-७ येथे १, कार्तिकनगर १, नंदनवन कॉलनी २, मामा चौक पद्मपुरा १, चाणक्यपुरी १, गौतमनगर १, भावसिंगपुरा १, उस्मानपुरा १, हनुमाननगर १, छत्रपतीनगर १, बनेवाडी १, शहानूरवाडी १, अबरार कॉलनी १, विमानतळ १, अरिहंतनगर २, जालाननगर १, सिडको गार्डन १, अन्‍य ८२.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ८, वडगाव १, पंढरपूर १, पाटोदा १, रांजणगाव १, गुरुसाक्षी फत्तेपूर २, वडगाव १, सिडको वाळूज महानगर २, वैजापूर १, कृष्णपूरवाडी २, मांडकी २, करोडी १, तीसगाव १, गंगापूर १, गारेगाव, पिंप्रीराजा १, कन्नड १, भराडी (ता. सिल्लोड) २, वसई (ता. सिल्लोड) १, कन्नड १, सावखेडा खंडाळा १, पळशी १, चितेगाव १, पानवी (बु) (ता. वैजापूर) १, लासूर नाका, (ता. गंगापूर) १, अन्य ४०५.