औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी ३९ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ५३ जण कोरोनामुक्त झाले, तसेच उपचार सुरू असताना तीन रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ३१५ झाली आहे, तर आतापर्यंत ४४ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ३९ रुग्णांत मनपा हद्दीतील ३२, ग्रामीण भागातील सात रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४६ आणि ग्रामीण भागातील सात, अशा एकूण ५३ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली.
सिल्लोड तालुक्यातील गेवराई शेमी येथील ८५ वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडी येथील ८० वर्षीय पुरुष, नूतन कॉलनी, क्रांतीचौकातील ८० वर्षीय पुरुष कोरोनबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
सुराणानगर २, सदाशिवनगर ३, जयभवानीनगर १, शिवशंकर कॉलनी १, एन-९, हडको १, जाधववाडी १, सरस्वती कॉलनी १, व्यंकटेशनगर १, जयभीमनगर १, सातारा परिसर १, कांचनवाडी १, गजानननगर १, अन्य १७.
ग्रामीण भागातील रुग्ण
दुधड १, बजाजनगर १, पैठण १, धूपखेडा १, अन्य ४.