औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २४ रुग्णांची वाढ झाली. यात मनपा हद्दीतील ९, ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे, तर दिवसभरात ४२ जणांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या ३१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागातील २६० आणि शहरातील ५६ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४६ हजार ७४१ एवढी झाली आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १६ आणि ग्रामीण भागातील २६ अशा ४२ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना गव्हाळी, (ता. कन्नड) येथील ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
मुकुंदनगर १, जयभवानीनगर १, चिनार गार्डन, पडेगाव १, मिलिटरी हॉस्पिटल १ यासह विविध भागात ५ रुग्णांची वाढ झाली.
ग्रामीण भागातील रुग्ण
औरंगाबाद १. फुलंब्री २, वैजापूर ११, पैठण १.