शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
4
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
5
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
6
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
7
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
8
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
9
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
10
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
11
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
12
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
13
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
14
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
15
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
16
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
17
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
18
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
19
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
20
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

जिल्ह्यात १३५२ कोरोना रुग्णांची वाढ, २१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १,३५२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४३८ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ ...

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १,३५२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४३८ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत २१ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १५,३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ५३६ झाली आहे, तर आतापर्यंत ८४ हजार १६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २०२५ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,३५२ रुग्णांत मनपा हद्दीतील ८१३ तर ग्रामीण ५३९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ९२३ आणि ग्रामीण ५१५ अशा १,४३८ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना गंगापूर येथील ६७ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६४ वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील ३५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६४ वर्षीय पुरुष, इटावा येथील ५८ वर्षीय महिला, भावसिंगपुरा येथील ५६ वर्षीय पुरुष, रामनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, दौलताबाद येथील ७० वर्षीय महिला, वैजापूर येथील ८५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, नागेश्वरवाडी येथील ८० वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ४५ वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ४३ वर्षीय पुरुष, घाटी परिसरातील ५२ वर्षीय महिला, फरदापूर, सोयगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, हर्सूल सावंगी येथील ६७ वर्षीय पुरुष, शिवनेरी कॉलनीतील ५० वर्षीय महिला, देवळाई रोड परिसरातील ६८ वर्षीय पुरुष, नायगव्हाण, फुलंब्री येथील ५० वर्षीय महिला, इटखेडा येथील ६८ वर्षीय पुरुष, बीड बायपास परिसरातील ३९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

सातारा परिसर १७, घाटी परिसर १, शिवाजीनगर ६, धूत हॉस्पिटल परिसर १, विष्णूनगर १, एअरपोर्ट १, देवानगरी ३, हर्सूल ९, मयूर पार्क ३, हिमायत बाग २, न्यू पहाडसिंगपुरा १, किल्लेअर्क १, एकतानगर १, समर्थनगर २, अंबिकानगर १, गारखेडा १०, हमालवाडा १, गुलमंडी १, बेगमपुरा २, दिल्ली गेट १, नंदनवन कॉलनी ५, भीमनगर १, पडेगाव ४, औरंगपुरा १, बन्सीलालनगर १, वेदांतनगर २, कोकणवाडी १, दशमेशनगर २, तापडियानगर २, श्रेयानगर १, अभिनय टॉकीज परिसर १, राहुलनगर १, समतानगर १, जालाननगर १, लक्ष्मी कॉलनी १, न्यू एसटी कॉलनी १, कांचनवाडी ८, क्रांती चौक १, राणानगर १, नवजीवन कॉलनी २, उस्मानपुरा ३, म्हाडा कॉलनी ५, मीरानगर १, खोकडपुरा ६, एन दोन सिडको ३, हडको ३, गुरुनानकनगर १, एसबीएच कॉलनी ४, सेव्हन हिल २, एन पाच सिडको ४, एन वन ३, कौशलनगर १, एन सात ११, नक्षत्रवाडी १, झांबड इस्टेट १, भोईवाडा परिसर १, राधामोहन कॉलनी १, बीड बायपास ९, एन तीन सिडको २, बालाजीनगर ५, सिटी चौक परिसर १, दिवाण देवडी १, पेठेनगर १, गजानननगर १, छत्रपतीनगर ३, हनुमाननगर ३, पांडुरंगनगर १, द्वारकादासनगर १, रेणुकानगर १, शिवनगर १, श्रीनिवासनगर २, आलोकनगर ३, कासलीवाल मार्बल १, साईनाथ सो. १, संकल्प पार्क ३, शिवकृपा रेसिडन्सी १, खडकेश्वर १, विजयंतनगर १, साईसंकेत पार्क १, गादिया विहार २, जवाहर कॉलनी ५, नवनाथनगर १, पैठण रोड १, अजित सीड्स परिसर १, नाथपुरम १, मुकुंदवाडी ३, जयभवानीनगर ७, रामनगर २, न्यू एसटी कॉलनी २, भूषणनगर १, उत्तरानगरी २, एन चार सिडको ११, एन दोन एसटी कॉलनी १, चौधरी कॉलनी १, प्रकाशनगर १, शेंद्रा एमआयडीसी २, पारिजातनगर १, विवेकानंदनगर १, गुरुसहानीनगर १, गजानन मंदिर परिसर ५, महालक्ष्मी चौक परिसर १, ठाकरेनगर ३, सुधाकरनगर १, ज्योतीनगर ३, राजीव गांधीनगर १, श्रेयनगर २, सूतगिरणी चौक ५, उल्कानगरी ३, पुंडलिकनगर ६, देवानगरी १, दुर्गेशनगर १, गजानन कॉलनी ३, देवळाई परिसर १, त्रिमूर्ती चौक १, भागीरथीनगर १, अजिंक्यनगर १, भानुदासनगर १, इंदिरानगर १, एन पाच सिडको २, मल्हार चौक १, जयनगर १, विठ्ठलनगर १, विश्वभक्ती कॉलनी १, भारतनगर १, नॅशनल कॉलनी १, गुरुदत्तनगर २, आकाशवाणी परिसर २, विश्रांतीनगर १, तिरुपतीनगर १, शिवशंकर कॉलनी १, स्वप्ननगरी १, राहुलनगर १, चिकलठाणा १, मोंढा १, न्यायनगर ३, वसंतनगर ३, कॅनॉट प्लेस १, प्रतापनगर १, कोतवालपुरा १, एन नऊ ३, एन सहा ५, एन पाच प्रियदर्शनी कॉलनी २, जाधववाडी ३, मिटमिटा १, एन अकरा ४, जयहिंदनगर १, नारेगाव ७, एन आठ येथे ३, उत्तरानगरी १, पडेगाव पोलिस कॉलनी २, देवगिरी कॉलनी १, विजयनगर १, भावसिंगपुरा २, पिसादेवी रोड ७, एमआयडीसी १, पोलीस कॉलनी, मिलकॉर्नर १, साईनगर १, प्रगती कॉलनी १, एन बारा हडको १, टीव्ही सेंटर १, ब्रिजवाडी १, नवजीवन कॉलनी १, शिवदत्तनगर १, सावंगी १, भगतसिंगनगर २, होनाजीनगर १, म्हसोबानगर १, जटवाडा रोड २, सुदर्शननगर १, साईनगर १, छावणी १, एन बारा येथे १, सिंधी कॉलनी १, मिलिनियम पार्क १, अन्य ४३४.

ग्रामीण भागातील रुग्ण

सिल्लोड १, लासूर स्टेशन १, जामखेड १, वडनेर १, वाळूज ४, लोहगाव १, चिंचपूर १, जोगेश्वरी १, महाराणा प्रताप चौक, सिल्लोड १, पळशी, सोयगाव २, तळणी, सिल्लोड १, चित्तेगाव १, जातेगाव १, कुंभेफळ १, खुलताबाद १, मूर्तिजापूर १, अन्य ५१९.