शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

शिवा ट्रस्टवर आयकरचे छापे; औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांची एकाचवेळी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 19:25 IST

करचुकवेगिरी, गैरव्यवहाराच्या संशयावरून आयकर विभागाने शिवा ट्रस्ट ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांवर मंगळवारी (दि.२५) एकाच वेळी छापे टाकले.

औरंगाबाद : करचुकवेगिरी, गैरव्यवहाराच्या संशयावरून आयकर विभागाने शिवा ट्रस्ट ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सच्या औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांवर मंगळवारी (दि.२५) एकाचवेळी छापे टाकले. यात महाविद्यालयांमध्ये एकूण विद्यार्थी, घेतलेले डोनेशन, खर्च आदींच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यात सुमारे २० कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय सूत्रांनी व्यक्त केला.  

१९९८ मध्ये शिवा ट्रस्टची स्थापना झाली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार आहेत. या संस्थेचे औरंगाबाद व श्रीरामपूर परिसरात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल, नर्सिंग स्कूल, पॉलिटेक्निक कॉलेज, कॉलेज आॅफ फार्मसी आदी शैक्षणिक संस्था व रुग्णालये चालविली जातात. मंगळवारी सकाळी १० वाजता आयकर विभागाच्या औरंगाबाद , अहमदनगर येथील ४० ते ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन्ही जिल्ह्यांतील शैक्षणिक संस्थांमध्ये एकाच वेळी सर्व्हे सुरू केला. त्याचे नंतर छाप्यात रूपांतर करण्यात आले. संस्थेतील कर्मचाऱ्यांना बसवून ठेवण्यात आले होते.

जालना रोडवरील सेव्हन हिल येथील एका इमारतीत वरच्या मजल्यावरील कार्यालयात विद्यार्थ्यांना येऊ दिले जात नव्हते. आज कोणतेही लेक्चर होणार नाही, असे सांगितले जात होते. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला  होता. आयकरचे अधिकारी, शैक्षणिक संस्थेत आजपर्यंत किती विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन झाले, त्यांच्याकडून किती डोनेशन घेतले. शासनाचा निधी मिळाला का, किती मिळाला, प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांची संख्या, त्यांच्या वेतनावरील खर्च, संस्थेच्या उद्देशानुसार शैक्षणिक संस्था सुरू आहे का, आयकराचा किती भरणा केला, विविध बँक अकाऊंट आदींची तपासणी केली जात होती. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. आणखी एक ते दोन दिवस तपासणी सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले. 

संस्थापक अध्यक्ष दिल्लीत शिवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार मंगळवारी दिल्लीत होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. ते शहरात आल्यावर त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मागील दोन महिन्यांतील दुसरी मोठी कारवाई बेहिशेबी मालमत्ता व करचुकवेगिरीच्या संशयावरून आयकर विभागाने शहरातील एका आॅईल मिलसह अन्य दोन बांधकाम व्यावसायिक, एका मोठ्या उद्योग समूहाच्या आर्थिक व्यवहाराची २१ आॅगस्ट रोजी तपासणी सुरू केली होती.या उद्योगाच्या संबंधित देशभरातील ८० संस्था, कंपन्यांची चौकशी करण्यात आली. सलग चार दिवस ही मोठी कारवाई सुरू होती. त्यानंतर मंगळवारी शिवा ट्रस्टच्या सर्व शैक्षणिक संस्थांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. मागील दोन महिन्यांतील आयकर विभागाची ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र