शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Income tax Raid: औरंगाबादेत शिवसेना नेत्याशी संबंधित व्यापाऱ्यावर आयकर विभागाची छापेमारी

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 7, 2022 13:33 IST

Income tax Raid in Aurangabad: शहरात व्यापाऱ्याचे निवासस्थान आणि इतर तीन ठिकाणी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला आहे

औरंगाबाद: शहरात आज पहाटे आयकर विभागाने चार ठिकाणी धाडी टाकल्याने एकच खडबड उडाली आहे. ज्योतीनगर येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या घरावर पुणे येथील आयकर विभागाचे पथक पहाटेच धडकले. येथे अधिकाऱ्यांनी झाडाझडती सुरू केली आहे. दरम्यान, हा व्यापारी शहरातील बड्या शिवसेना नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. (Income tax department)  

पहाटे चार वाजेपासून या ठिकाणी झडती सुरू आहे. सतीश व्यास असे धाड पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ज्योती नगर येथील त्यांच्या निवास्थानी आयकर विभागाचे पथक कागदपत्रांची तपासणी करत आहे. हा व्यापारी शहरातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा नातेवाईक असल्याची माहिती आहे. व्यास यांचे निवास्थान आणि इतर तीन ठिकाणी आयकरच्या पथकाने धाड टाकल्याचे समजत आहे.

देशभरात सुरु आहे छापेमारी देशभरात विविध ठिकाणी आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आज राजकीय फंडिंग प्रकरणी आयकर विभागाकडून देशभरात 50 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीपासून उत्तराखंड आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये आयकर विभागाची पथके पोहोचली आहेत. तसेच बंगळुरूमध्ये २० हून अधिक ठिकाणी आणि मुंबईतही ४ ते ५ ठिकाणी आयकर विभागाकडून झाडाझडती सुरु असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सAurangabadऔरंगाबाद