शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

३५ गावांचा राष्टÑीय पेयजल योजनेत समावेश

By admin | Updated: May 13, 2014 01:07 IST

रमेश शिंदे , औसा उन्हाळ्याची चाहुल लागली की पाणी टंचाई ही औसा तालुक्यात कायम ठरलेली असते.

 रमेश शिंदे , औसा उन्हाळ्याची चाहुल लागली की पाणी टंचाई ही औसा तालुक्यात कायम ठरलेली असते. ही पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी गावातील नागरिकांची मागणी टंचाईमधून मुक्तता व्हावी म्हणून तालुक्यातील ४१ गावामध्ये पाणी पुरवठ्याची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. भारत निर्माण, शिवकालीन पाणी पुरवठा, दलित वस्ती सुधार योजना पाणी पुरवठा योजना, राष्टÑीय ग्रामीण पेयजल अशी विविध ४१ कामांचा समावेश आणि ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील बर्‍याच गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे. औसा तालुका हा तसा पावसाळी पाण्यावर अवलंबून असलेला तालुका आहे. तालुक्यात ना मोठ्या नद्या आहेत, ना मोठे प्रकल्प आहेत. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर बरेच अवलंबून आहे. तावरजा, तेरणा आणि मसलगा प्रकल्पामधून विविध ७६ गावामध्ये प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत, पण अनेक गावात पाण्यासाठी ओरड असते. उन्हाळ्याची सुरुवात झाली की बर्‍याच गावात पाण्यासाठी भटकंती ठरलेली असते. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी या सर्व योजना पूर्ण झाल्यानंतर यश मिळण्याची शक्यता आहे. भारत निर्माण योजनेअंतर्गत गुळखेडा, जयनगर, चिंचोलीजोगन, धानोरा, चिंचोलीसोन, एकंबीतांडा, केंगलवाडी, बोरफळतांडा, सत्तरधरवाडी, होळी, किल्लारी, आपचुंदा, सारणी, तपसेचिंचोली, गाढवेवाडी तांडा या गावांचा समावेश असून यामधील १३ कामे पूर्ण झाली आहेत. दलित वस्ती सुधार पाणीपुरवठा योजनेमध्ये माळुंब्रा, यल्लोरी, रामेगाव, उंबडगा (खु), करजगाव, दावतपूर, उंबडगा (बु.), मातोळा, सारोळा, मासुर्डी, याकतपूर, तांबरवाडी, शिवली या गावांचा समावेश आहे. यामधील ही ७ कामे पूर्ण झाली असून ५ प्रगतीपथावर आहेत तर २ कामे रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. शिवणीलख वाडी, सेलु, किनीथोट, बिरवली, सारोळा, येळी, एकंबीतांडा, आंदोरा, कवठाकेन, एरंडी, टेंबी, दावतपूर, महादेववाडी, वानवडा, फत्तेपूर या पंधरा गावात शिवकालीन पाणी साठवण योजनेअंतर्गत विविध कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील बहुतांश गावामध्ये जाणवणार्‍या पाणी टंचाईच्या झळा कमी होणार आहेत.