लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सकल जैन समाजांतर्गत भगवान महावीर जन्मोत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १८ रोजी या समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.खाराकुंवा येथील पोरवाल भवन येथे दुपारी ४ वाजता कार्यालयाचे उद्घाटन सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, कोषाध्यक्ष जी.एम. बोथरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच महाप्रसादाचे दाता शेखर देसरडा, सकल जैन समाजातील विविध संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.या उद्घाटन सोहळ्यात सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया यांनी केले आहे.
महावीर जन्मोत्सव समिती कार्यालयाचे आज औरंगाबादेत उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:24 IST