शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

आयकॉन स्टील प्रस्तुत ‘लोकमत प्रॉपर्टी शो’चे आज उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहरात व आसपासच्या परिसरात आपण घर खरेदी करण्यास इच्छुक आहात, मग विचार कसला करता. ...

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद शहरात व आसपासच्या परिसरात आपण घर खरेदी करण्यास इच्छुक आहात, मग विचार कसला करता. उद्या शुक्रवारी, १९ फेब्रुवारीला ‘आयकॉन स्टील प्रस्तुत लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’चे उद्‌घाटन होणार आहे. या गृह प्रदर्शनातच तुम्हाला तुमच्या हक्काच्या घरासाठी बहुपर्याय मिळणार आहेत.

जालना रोडवरील लोकमत भवन येथे सकाळी १०.३० वाजता प्रदर्शनाचे उद्‌घाटन मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, आयकॉन स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश राठी, औरंगाबाद क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा व क्रेडाईचे अध्यक्ष (इलेक्ट) नितीन बगडिया यांची उपस्थिती राहणार आहे.

या प्रदर्शनात शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या १०० पेक्षा अधिक गृह प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.

यात बंगलोज, रो-हाऊसेस, लक्झरी फ्लॅटस्‌, पेंट हाऊस, फार्म हाऊस, शोरूम, शॉप्स, ऑफिसेस, गोडाऊन व ओपन प्लॉटस्‌ उपलब्ध असणार आहेत व बुकिंग येथेच करण्यात येणार आहे.

सर्व स्तरांतील ग्राहकांच्या बजेटनुसार घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एवढेच नव्हे, तर ग्राहकांना पसंत पडलेल्या गृह प्रकल्पांना लगेच भेट देण्यासाठी बांधकाम व्यावसायिक वाहनाची व्यवस्थाही करणार आहे. प्रदर्शनात जे ग्राहक बुकिंग करतील त्यांना बांधकाम व्यावसायिक विशेष सवलत देणार आहेत. काहींनी प्रोत्साहनपर बक्षिसेही ठेवली आहेत. मग तयार राहा शुक्रवारी, १९ फेब्रुवारीला आपले स्वप्नपूर्ती करणारे गृह प्रदर्शन बघण्यासाठी. प्रवेश सर्वांना मोफत आहे.

हे गृह प्रदर्शन तीन दिवस म्हणजे रविवार, २१ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेदरम्यान सुरू राहील. ग्राहकांनी या संधीचा फायदा घ्यावा व बहुपर्यायांतून स्वतःचे हक्काचे घर बुक करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चौकट

औरंगाबादसह पुण्यातील गृह प्रकल्पाची

माहिती प्रदर्शनात

या गृह प्रदर्शनात औरंगाबाद शहर व परिसरातील गृह प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. त्याचसोबत येथील बांधकाम व्यावसायिकांनी पुण्यात बांधलेल्या गृह प्रकल्पाची माहितीही येथेच मिळणार असल्याने ग्राहकांच्या वेळेची व पैशाची मोठी बचत होणार आहे.

चौकट

भाग्यवान विजेत्यांना चांदीचे शिक्के

‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’ला भेट देणाऱ्या ५ भाग्यवान विजेत्यांना रोज चांदीचा शिक्का व अनेक भेटवस्तू जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चौकट

सुरक्षेची संपूर्ण खबरदारी

‘लोकमत प्रॉपर्टी शो २०२१’ या प्रदर्शनात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेठ नंदलाल धूत हॉस्पिटलतर्फे येथे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येकाची थर्मल गनने तपासणी करण्यात येईल. सॅनिटायझर लावण्यात येणार आहे. मास्क लावल्यावरच प्रदर्शनात प्रवेश देण्यात येणार आहे. लोकमत भवनमध्ये संपूर्ण प्रदर्शनाची सुटसुटीत मांडणी करण्यात आली आहे. चालण्यासाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे.

चौकट

एकावेळी फक्त ५० जणांनाच प्रवेश

घर खरेदीदारांची संख्या मोठी आहे. गृह प्रदर्शनात होणारी गर्दी लक्षात घेता एकाच वेळी फक्त ५० नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. याप्रमाणे ठरावीक वेळेच्या अंतराने ५०-५० नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे.