शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा ठपका

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

औरंगाबाद : महापालिकेत पदाधिकारी उपलब्ध होत नाहीत. अधिकारी तर पदाधिकारी आणि नगरसेवकांना दाद देत नाहीत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत

औरंगाबाद : महापालिकेत पदाधिकारी उपलब्ध होत नाहीत. अधिकारी तर पदाधिकारी आणि नगरसेवकांना दाद देत नाहीत. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विकासकामे ठप्प पडली आहेत. या सगळ्यांचा संताप नगरसेवकांनी उपमहापौर संजय जोशी यांच्यावर काढून आपली खदखद व्यक्त केली.सत्ताधारी पदाधिकारी निष्क्रिय असल्याचा अप्रत्यक्ष आरोप नगरसेवकांनी केला. मनपाच्या वर्धापनदिनी हा सगळा आसूड ओढण्याचा प्रकार घडला. सभागृह नेते किशोर नागरे, नितीन चित्ते, बालाजी मुंडे, महेश माळवतकर यांच्यात उपमहापौरांच्या दालनात सुरू असलेली अनौपचारिक चर्चा अचानक वेगळ्या वळणावर जाऊन ठेपली. पालिकेत कुठलाही पदाधिकारी नगरसेवकांच्या व्यथा ऐकून घेण्यास तयार नाही. उपमहापौर जोशी उपलब्ध असल्यामुळे नगरसेवक आज त्यांच्यावर घसरले. माळवतकर, मुंडे यांच्याही तक्रारी होत्याच. सगळे प्रकरण हे आयुक्त, प्रशासकीय कामकाज आणि पदाधिकाऱ्यांच्या सक्षमतेच्या आजू-बाजूने फिरत होते. प्रकरण क्रमांक १नितीन चित्ते यांच्या पत्नी ऊर्मिला चित्ते या नगरसेविका आहेत. त्यांच्या वार्डातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांवरून ते वारंवार प्रशासनाला निवेदने देऊन कारवाईची मागणी करीत आहेत; मात्र कुणीही त्यांना दाद देत नाही. त्यावरून आज ते उपमहापौरांवर संतापले. उपमहापौरांनी अधिकारी शिवाजी झनझन यांना चित्ते यांच्या वार्डातील अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. मात्र झनझन यांनी ती कारवाई केली नाही. त्यामुळे चित्ते म्हणाले, अधिकारी पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत. जोशी यांनीही चित्ते यांना रागाच्या भरात सुनावले. ते म्हणाले, तुम्हाला काय करायचे, कुणाकडे तक्रार करायची ती करा. प्रकरण क्रमांक २चित्ते यांचा वाद संपत नाही, तोवर नगरसेवक बालाजी मुंडे यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अधिकारी महापौरांचेही ऐकत नाहीत. विकासकामांसाठी नगरसेवक पालिकेत हेलपाटे मारतात. अधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत, तर अधिकारी पदाधिकाऱ्यांना दाद देत नाहीत. प्रकरण क्रमांक ३नगरसेवक महेश माळवतकर म्हणाले, विकासकामे ही झालीच पाहिजेत. पदाधिकारी येथे कशासाठी बसले आहेत. पदाधिकारी येथे बसले आहेत तर त्यांचा उपयोग झालाच पाहिजे. राजीनामे देऊन किंवा माफी मागून काम भागणार नाही. ४विकासकामे होत नसल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे देऊन टाकले पाहिजेत. पत्रके वाटून जनतेची माफी मागितली पाहिजे. आम्हाला माफ करा, आम्ही तुमची कामे करू शकत नाही. विकासकामे होणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगून टाका. जनतेला पत्रक वाटून आम्हीच तसे सांगू, असा सूरही नगरसेवकांनी उपमहापौरांशी बोलताना आळविला. आयुक्तांना घेरण्याची तयारी ४उपमहापौरांच्या दालनातील ही सगळी चर्चा आयुक्त महाजन यांना घेरण्याच्या बाजूने सुरू होती. गेल्या शनिवारी विरोधकांनी महाजन यांना घेरून विकासकामांचा मार्ग मोकळा करून घेतला. आता सत्ताधारी नगरसेवक आयुक्तांंच्या बंगल्यासमोर ठिय्या देण्याच्या तयारीत आहेत.