शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विद्यापीठाच्या अकॅडमिक ऑडीटमध्ये आतापर्यंत २१ काॅलेज नापास, ३४ काॅलेजची परीक्षा बाकी

By योगेश पायघन | Updated: August 29, 2022 17:57 IST

अतिरिक्त तुकडी, पदव्युत्तर अभ्यासक्रम बंदचा निर्णय, कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांची माहीती

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना नो ग्रेड दिलेल्या ५५ पैकी २१ महाविद्यालयांच्या तपासणी भाैतिक सुविधा, प्राचार्य अध्यापक नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्या महाविद्यालयांतील अतिरीक्त तुकड्या, पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय सोमवारी विद्या परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहीती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली.

विद्यापीठाने दर्जा वाढवण्यासाठी शैक्षणिक मूल्यांकनाची मोहीम हाती घेतली आहे. विद्यापीठाशी संलग्नित ४८० पैकी ४०१ कॉलेजचे मूल्यांकन करण्यासाठी प्रस्ताव आले. त्यापैकी मूल्यांकन पूर्ण झालेल्य २१८ महाविद्यालयांचे सलग्नीकरण नुतणीकरण विद्या परिषदेत मंजुर करण्यात आले. मूल्यांकनात ३९ महाविद्यालयांना ए, ३५ महाविद्यालयांना बी, ३४ महाविद्यालयांना सी ग्रेड तर ६८ महाविद्यालयांना डी ग्रेड देण्यात आला होता. तर नो ग्रेडचे ४५ महाविद्यालयातून डी ग्रेड व नो ग्रेडच्या महाविद्यालयातून ७० महाविद्यालये निवडून त्यांच्या भाैतिक सुविधांची पडताळणी सुरू झाली आहे. त्यातील १९ महाविद्यालायांवर कुलगुरूंनी विशेष अधिकारात केलेल्या कार्यवाहीचे बैठकीत काैतुक करत सदस्यांनी अभिनंदन करून त्या कारवाईवर शिक्कामोर्तब केले. उर्वरित ४ महाविद्यालयांची सुनावणी लवकरच होईल असेही कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले. तर ही प्राधिकरणाची शेवटची बैठक असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले.

निवृत्त प्राध्यापकांना नेमू शकता, पण....सलग्नीत ४०१ पैकी ज्या महाविद्यालयांना पाच वर्ष पूर्ण न झाले नाही असे ५५ महाविद्यालये शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण प्रक्रीयेत सहभागी झाले नाहीत. त्यांना तपासून सलग्नीकरण नुतणीकरणासाठी समित्या कुलगुरूंनी नेमल्या. ५५ पैकी केवळ २१ महाविद्यालयांची तपासणी पुर्ण झाली. विद्यापीठ कायद्यानुसार निवडलेले प्राचार्य, अध्यापक नाहीत. तसेच नॅकही झालेले नसल्याने केवळ मुळ तुकडी यावर्षी सुरू ठेवावी. दोन महिन्यात प्राचार्य, अध्यापक नेमन्याच्या अटिवर ही परवानगी देण्यात आली. तर अतिरिक्त आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तुकड्या बंद करण्यात आल्या. तर निवृत्तीनंतर ६५ वर्षां वयापर्यंतचे निवृत्त प्राध्यापकांना प्राचार्य म्हणून नेमता येईल. मात्र, विद्यापीठाच्या कायद्यानुसार नेमणूक हवी. तरच परवानगी देवू असेही कुलगुरू म्हणाले.

७ दिवसांत तपासणी करा, अन्यथा सलग्नीकरण रद्द...उर्वरीत ३४ महाविद्यालयांनी अद्याप समित्यांना बोलावले नाही. किंवा तपासणी करून घेतली नाही. त्यांनी पुढील आठ दिवसांत समित्यांना बोलून तपासणी करून घ्यावी. अन्यथा त्यांचे सलग्नीकरण रद्द करण्याचा इशाराही कुलगुरू डाॅ.प्रमोद येवले यांनी दिला आहे.

या महाविद्यालयांवर झाली कारवाई: मशिप्र मंडळाचे शेख अहमद महिला कला महाविद्यालय हर्सूलडाॅ. अब्दुल कलाम उर्दू कला वरिष्ठ महाविद्यालय सुलतानपुरडाॅ. एपीजे अब्दुल कलाम कला व विज्ञान महाविद्यालय उंडणगावप्रा. भाऊराव उबाळे वरिष्ठ महाविद्यालय सुलतानपुरराजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय घोडेगावश्री गोरक्ष कला वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय खामगावनॅशनल कला व विज्ञान महाविद्यालय फर्दापूर,रामकृष्ण वरिष्ठ महाविद्यालय दहेगाव,कला व विज्ञान महाविद्यालय लोहगाव,राचकुंवर महाविद्यालय बनोटी,छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय जालना,डाॅ. महोम्मद बद्रुद्दीन वरिष्ठ महाविद्यालय जालना,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वालसावंगी,वैजिनाथराव आकात महाविद्यालय परतूरसावित्रिबाई फुले महिला महाविद्यालय जाफ्राबाद,श्री शिवाजी कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जाफ्राबाद,बाळासाहेब ठाकरे महाविद्यालय गणेशनगर गोलापांगरी,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विझोरा,छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय,उस्मानाबाद, संतराम लोमटे वरिष्ठ महाविद्यालय सलगरा ता. तुळजापुर

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद