शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

‘नाट्यगृह देता का नाट्यगृह!’; मराठवाड्यात भाडे परवडत नसल्याने हौशी नाटके होईनात

By बापू सोळुंके | Updated: November 5, 2023 12:20 IST

मराठवाड्याला एक चांगली नाट्यपरंपरा लाभलेली आहे. यामुळे येथे सतत हौशी नाटकांचे सादरीकरण होते.

छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने रंगकर्मी, नाट्य संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी एक नाट्यगृह उभारण्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली अशा शहरात नाट्यगृहच नाही. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरात असलेले नाट्यगृहाचे भाडे परवडत नसल्याने नाटकांसाठी ‘नाट्यगृह देता, का नाट्यगृह’ अशी म्हणण्याची वेळ नाट्यकर्मींवर आली आहे.

मराठवाड्याला एक चांगली नाट्यपरंपरा लाभलेली आहे. यामुळे येथे सतत हौशी नाटकांचे सादरीकरण होते. छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेचे संत एकनाथ रंगमंदिर आणि नंतर सिडको नाट्यगृह उभारण्यात आले. अनेक वर्षे बंद असलेले संत एकनाथ रंगमंदिर सुरू झाले असले तरी महापालिकेने ते खासगी संस्थेला चालविण्यास दिले आहे. सिडको नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद आहे. जालना येथील फुलंब्रीकर नाट्यगृह व परभणी येथील नटराज नाट्यगृह अनेक वर्षांपासून बंद आहेत. बीड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सुसज्ज स्थितीत आहे. धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दुरुस्तीसाठी वर्षभरापासून बंद आहे. नांदेड येथील महापालिकेच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाची दुरवस्था झाली तर खासगी संस्थेचे कुसुम नाट्यगृह आहे.

सध्या खासगी नाट्यगृहात तीन अंकी नाट्यप्रयोग करायचा असेल तर २० हजारांवर भाडे आकारले जाते. एखाद्या संस्थेला एकांकिका स्पर्धेसाठी नाट्यगृह दोन दिवस जरी किरायाने घ्यायचे ठरवले तर त्यासाठी लागणारे भाडे भरण्याची कुवत त्यांची नसते. पूर्वी नाट्यचळवळीला पोषक वातावरण असायचे, यामुळे सतत कलावंत हौशी नाटकांचे प्रयोग करायचे. आता मात्र हौशी नाटकांना हवा तसा प्रेक्षक मिळत नाही. परिणामी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून नाट्यगृहाचे भाडेही भरणे कठीण होते. पण मोठ्या कलावंतांच्या व्यावसायिक नाटकांचे प्रयोग हाऊसफुल होतात.

स्थानिक कलावंतांना सवलत हवीमराठवाड्यातील नाट्यगृह बंद पडायला शासनाला जबाबदार धरण्यापेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रमुख अधिकारी जबाबदार आहेत. स्थानिक प्रशासन आणि आमदारांनी नाट्यगृह टिकावे, यासाठी विशेष निधीची तरतूद ठेवावी. नाट्यगृहाचे भाडे ठरविताना स्थानिक कलावंतांना सवलत हवी. मात्र तसे होत नसल्याने नाट्यगृह उभारून काय फायदा?-डॉ. जयंत शेवतेकर, माजी नाट्य व संगीत विभागप्रमुख, डॉ. बा. आं. म. विद्यापीठ

तरच नाट्यचळवळ टिकेलहौशी नाटकांसाठी व्यावसायिक नाटकांंच्या केवळ दहा ते पंधरा टक्केच नाट्यगृहाचे भाडे आकारायला हवे. असे झाल्यासच आपली नाट्यचळवळ टिकेल.- रावबा गजमल, नाट्यकलावंत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद