शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदाच मिळाल्या महिला आमदार

By संतोष हिरेमठ | Updated: November 24, 2024 11:37 IST

कन्नडमधून संजना जाधव विजयी; यापूर्वी दोन वेळा महिला उमेदवारांचा पराभव

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार संजना जाधव यांच्या माध्यमातून गेल्या ३४ वर्षांत जिल्ह्यात शिवसेनेला (शिंदेसेना) पहिल्यांदाच महिला आमदार मिळाल्या. यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही महिला उमेदवारांचा पराभव झाला होता. यंदा मात्र, संजना जाधव यांनी सेनेच्या महिला उमेदवारांचा पराभव खंडित करून विजय खेचून आणला.

विधानसभा निवडणुकीत गेल्या ३४ वर्षांत शिवसेनेने ३९ जणांना उमेदवारी दिली. यात अवघ्या २ महिलांचा समावेश होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर यंदा उद्धवसेना आणि शिंदेसेना असे शिवसेनेचे दोन गट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आले. शिंदेसेनेने कन्नडमधून भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या माध्यमातून महिला उमेदवाराच्या हाती ‘धनुष्यबाण’ दिला.

शिवसेनेने गेल्या ३४ वर्षांत जिल्ह्यात अवघ्या दोन मतदारसंघांत महिला उमेदवार दिल्या. मात्र, या दोन्ही महिला उमेदवारांचा पराभव झाला. यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजना जाधव यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यानंतर, शिंदेसेनेकडून संजना जाधव यांना कन्नड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले होते.

यापूर्वी ‘धनुष्यबाणा’वर लढलेल्या महिला उमेदवारगंगापूर मतदारसंघात १९९५ मध्ये शिवसेनेने आशा श्रीमंतराव थोरात यांना उमेदवारी दिली, तर २०१४ मध्ये पूर्व मतदारसंघात कला ओझा यांना ‘धनुष्यबाण’ या निशाणीवर म्हणजे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढल्या. मात्र, या दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला होता.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkannad-acकन्नड