शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात समुद्रसपाटीपासून २१३४ फूट उंचीवर आहे धार्मिक पर्यटनस्थळ, पाहिले का?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 3, 2024 16:32 IST

गणेश टेकडीवर गेल्यावर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचे विहंगम दृश्य एका नजरेत पाहण्यास मिळते.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्वात उंच ठिकाणी, म्हणजे सातपुड्याच्या डोंगररांगेत समुद्रसपाटीपासून २,१३४ फूट उंचावर असलेली ‘गणेश टेकडी’ हे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. निसर्गरम्य वातावरणात, नागमोडी वाटा, उंचावर साहसी चढाई करण्याची ज्यांना आवड आहे, अशांसाठी हे शहरातील धार्मिक स्थळ पर्वणीपेक्षा कमी नाही. मग चला, नवीन वर्षाची सुरुवात गणेश टेकडीवर चढाई करून गणरायाचे दर्शन व शहराचे विहंगम दृश्य पाहूया...

कुठे आहे गणेश टेकडी?पर्यटनाची राजधानी असलेले ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात उत्तर बाजूस ‘बीबीका मकबरा’ व हनुमान टेकडी यांच्या पूर्व बाजूस एक मोठी टेकडी दिसते. तेथे एक मंदिरही बांधण्यात आले आहे. तीच ‘गणेश टेकडी’ होय. हनुमान टेकडीपासून येथे जाण्यासाठी रस्ता आहे.

नागमोडी वाटा, ७९ पायऱ्याहनुमान टेकडीला वळसा घालून आपण पूर्व बाजूला जात असताना खडकाच्या नागमोडी वाटांतून गणेश टेकडीकडे जाताना शहराचा नजरा बघण्यास मिळतो. मध्यावर गेल्यावर पायऱ्या दिसायला लागतात. ७९ पायऱ्या चढून वर गेल्यावर डोंगराच्या माथ्यावर जाऊन आपण पोहोचतो. समुद्रसपाटीपासून २,१३४ फूट उंचीवर आपण येऊन पोहोचलो, याचा आनंद होतो. गणपती व शहराच्या दर्शनाने सर्व थकवा निघून जातो.

एका नजरेत शहराचे विहंगम दृश्यगणेश टेकडीवर गेल्यावर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरचे विहंगम दृश्य एका नजरेत पाहण्यास मिळते. उंचावर उभारलेला भगवा ध्वज, समोरील बाजूस बीबीका मकबरा, हनुमान टेकडी, दूर दिसणारी गोगाबाबा टेकडी एवढेच नव्हे दक्षिण बाजूला साताऱ्याच्या डोंगररांगा आणि उंच उंच इमारती, चोहो बाजूंनी आपल्या शहराचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरते.

अमेझॉनच्या जंगलासारखी वाटणारी हिमायत बागदाट गडद हिरवी झाडी असलेला मोठा भूभाग गणेश टेकडीवरून सर्वांचे लक्ष वेधून घेतो. अमेझॉनच्या जंगलासारखा वाटणारा हा भाग प्रत्यक्षात मुगलकालीन ‘हिमायत बाग’ होय.

भाविकांच्या एकजुटीचे प्रतीकगणेश टेकडीवर सुमारे १५० वर्षे जुनी दगडी गणपतीची मूर्ती होती. २१ व २२ एप्रिल २०२२ ला येथे जयपूरहून आणलेल्या संगमरवरी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जेथे साधे पायी चालणे कठीण, तेथे भाविकांनी विटा, वाळू, सिमेंट, सळ्या, पाणी वर नेले. त्यातूनच टेकडीवर जाण्यासाठीच्या पायऱ्या व छोटे मंदिर उभे राहिले. यासाठी बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, हिमायतबाग, हडको, हर्सूल परिसरातील भाविकांनी तन, मन, धनाने सेवा केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक