शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

औरंगाबादेत एक राष्ट्रीय, चार प्रादेशिक पक्षांसह ४४ उमेदवार मैदानात; ७ जणांचे अर्ज बाद

By विकास राऊत | Updated: April 27, 2024 15:04 IST

निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ३६ मुद्द्यांनुसार अर्जांची छाननी करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी अर्ज छाननीअंती सात उमेदवारांचे अर्ज बाद झाले, अशी माहिती निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधी कायद्यानुसार ३६ मुद्द्यांनुसार अर्जांची छाननी करण्यात आली. सात उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने ४४ उमेदवार रिंगणात आहेत. ज्यांनी सूचकांची संख्या दिलेली नव्हती, त्यांचे अर्ज बाद झाले. उमेदवार अपक्ष किंवा नोंदणीकृत पक्ष असेल, तर त्यांना १० सूचक लागतात. काही उमेदवारांनी कमी सूचक संख्या दिली होती. काही उमेदवारांनी सूचकांची नावे दिली, परंतु ते मतदारसंघातील नव्हते. तरीही सर्वांसमक्ष उमेदवारांना सूचकांबाबत संधी दिली होती. परंतु त्यांना दुरुस्ती करता आली नाही, असेही स्वामी यांनी सांगितले.

चार प्रादेशिक आणि बसपा या एकाच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा समावेश आहे. तर ३९ अपक्ष उमेदवार आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. उमेदवारांची संख्या पाहता तीन ईव्हीएम प्रत्येक मतदान केंद्रावर लागल्यास प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी....................... कारण- नंदा सुभाष मुके - भारतीय जवान किसान पार्टी...........................उमेदवार व सूचक म्हणून स्वत:चे नाव लिहिले- श्रीराम बन्सीलाल जाधव - जय सेवालाल बहुजन विकास पार्टी.......सूचकांची नावे कमी होती.- रंजन गणेश साळवे - इन्सानियत पार्टी................सूचकांची नाव मतदार यादीत नव्हती.- शेख समीर शेख शफिक - सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया.........सूचकांची नावे कमी होती.- सुरेश धोंडू चौधरी - अपक्ष..................सूचक कमी होते.- सचिन रामनाथ मंडलिक - अपक्ष.............सूचक कमी होते- रामनाथ पिराजी मंडलिक - अपक्ष.............सूचक कमी होते

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी...चंद्रकांत भाऊराव खैरे, उद्धवसेनासंदीपान आसाराम भुमरे, शिंदेसेनासय्यद इम्तियाज जलील, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनसंजय उत्तमराव जगताप, बहुजन समाज पार्टीहर्षवर्धन रायभान जाधव, अपक्षमनीषा खरात, बहुजन महाराष्ट्र पार्टीखान एजाज अहमद, अपक्षसुरेश आसाराम फुलारे, अपक्षखाजा कासीम शेख, अपक्षबबनगिर उत्तमगीर गोसावी, हिंदुस्थान जनता पार्टीकिरण सखाराम बर्डे, अपक्षदेवीदास रतन कसबे, अपक्षजगन्नाथ किसन उगले, अपक्षअरविंद किसनराव कांबळे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीअब्दुल अजीम अब्दुल अजीज शेख, अपक्षरवींद्र भास्करराव बोडखे, भारतीय युवा जन एकता पार्टीसंजय भास्कर शिरसाट, अपक्षमोहम्मद नसीम शेख, अपक्षसुरेंद्र दिगंबर गजभारे, अपक्षसाहेबखान यासिनखान पठाण, अपक्षगोरखनाथ राजपूत राठोड, अपक्षप्रतीक्षा प्रशांत चव्हाण, आंबेडकरवादी रिपब्लिकन पक्षजियाउल्लाह अकबर शेख, अपक्षजगन्नाथ खंडेराव जाधव, अपक्षवसंत संभाजी भालेराव, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीपंचशीला बाबूलाल जाधव, रिपब्लिकन बहुजन सेनासंगीता गणेश जाधव, अपक्षनितीन पुंडलिक घुगे, अपक्षनारायण उत्तम जाधव, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)मिनासिंग अवधेशसिंग सिंग, अपक्षप्रशांत पुंडलिकराव आव्हाळे, अपक्षमधुकर पद्माकर त्रिभुवन, अपक्षमनोज विनायकराव घोडके, अपक्षविश्वास पंडित म्हस्के, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)डॉ. जीवनसिंग भावलाल राजपूत, अपक्षभरत पुरुषोत्तम कदम, राष्ट्रीय मराठा पार्टीअर्जुन भगवानराव गालफाडे, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीसंदीप देवीदास जाधव, अपक्षलतीफ जब्बार खान, अपक्षसंदीप दादाराव मानकर, अपक्षअब्दुल समद बागवान, एआयएमआयएम (आयएनक्यू)भानुदास रामदास सरोदे पाटील, अपक्ष

वंचितकडून दोन अर्ज ...वंचित बहुजन आघाडीकडून दोन उमेदवारी अर्ज आहेत. विशाल उद्धव नांदरकर आणि अफसर खान यासिन खान यांचे अर्ज वंचितकडून असले तरी खान यांच्या अर्जाला बी-फॉर्म आलेला आहे, असे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४