शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात फक्त 3 दिवस संचारबंदी लावा; व्यापारी महासंघाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 16:11 IST

यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.

ठळक मुद्देव्यापारी प्रतिनिधींनी १० दिवसांऐवजी तीन दिवस संचारबंदी लागू करावी, असे मत मांडले.  

औरंगाबाद : बेशिस्त लोकांना प्रतिबंध करणे व परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यासाठी शहरात १० ते १२ जुलैदरम्यान संचारबंदी लागू करण्यात यावी, यावर लोकप्रतिनिधी व व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांच्यात गुरुवारी सुभेदारीत झालेल्या बैठकीत सहमती झाली. यासंदर्भात शुक्रवारी मनपा आयुक्त व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत.

यावेळी खा. भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे तसेच महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल्ल मालाणी, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, महासचिव लक्ष्मीनारायण राठी, माजी अध्यक्ष अजय शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत शहरात झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या आणि बेशिस्त नागरिकांबद्दल  चिंता व्यक्त झाली. आ. शिरसाट व आ. दानवे यांनी शहरात १० दिवस संचारबंदी लागू करावी, असे नमूद केले. व्यापारी प्रतिनिधींनी १० दिवसांऐवजी तीन दिवस संचारबंदी लागू करावी, असे मत मांडले.  

आ. सावे यांनी सांगितले की, संचारबंदीत संपूर्ण किराणा दुकाने तसेच औषधी दुकानेही बंद ठेवण्यात यावीत. जिथे हॉस्पिटल आहे तिथे औषधी दुकाने उघडी ठेवावीत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोणालाही पास  देऊ नये. अगदी लोकप्रतिनिधींनादेखील असे पास दिले जाऊ नये, असे केले तरच संचारबंदीचा उद्देश सफल होईल. आ. शिरसाट यांनी सांगितले की, संचारबंदीत जे विनाकारण बाहेर पडतील, त्यांना पोलिसांनी फटके मारावेत, तर आ. दानवे म्हणाले की, संपूर्ण शहरात संचारबंदी असावी. 

लॉकडाऊन नकोच : मानसिंग पवार म्हणाले की, लॉकडाऊन केल्याने रुग्ण संख्या कमी झाली, असा अभ्यास झाला नाही. लॉकडाऊन करण्यामुळे सामाजिक प्रश्न वाढतील.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय