शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाची माहिती, २० रुपयांत दोन लाखांचा विमा तुम्ही काढला का? येथे करा अर्ज

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 10, 2023 17:50 IST

२० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जातो. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.

छत्रपती संभाजीनगर : माणसाच्या जीवनाचे काही खरे राहिले नाही. रस्त्यात चालता चालता कधी कोणती दुर्घटना घडले, किंवा वाहनांचा अपघात होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अपघात झाल्यानंतर रुग्णाला होणारा भयंकर त्रास तर सोडाच रुग्णालयात येणारा खर्च ही डोंगराएवढा असतो. याचा सर्वांगीण विचार करुन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राबविली जात आहे. याद्वारे २० रुपयांत दोन लाखांचा विमा काढला जात आहे. तुम्हाला हे माहिती आहे का, नसेल तर पुढील माहिती आवश्यक वाचा.

काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ?दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्त्वाचे आहे. अनावधानाने अपघात झाल्यास अशा वेळी पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना आर्थिक मदतीसाठी धावून येते.

२० रुपयांत दोन लाखांचा विमाया योजनेचा विमा हप्ता केवळ २० रुपये असून विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला २ लाख रुपये अर्थसाह्य मिळते. अपघातात पूर्णतः अपंगत्व आल्यास २ लाख रुपये व आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळतात.

जिल्ह्यात ७.७३ लाख विमाधारक१) ५० लाख ४१ हजार एकूण बचत खातेधारक जिल्ह्यात आहेत.२) ३८ लाख ५५ हजार खातेधारक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी पात्र आहेत.३) ७ लाख ७३ हजार खातेधारकांचा विमा काढण्यात आला आहे.

आपल्या बँकेत करा अर्जतुमचे बचत खाते ज्या बँकेत आहे. त्या बँकेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज दाखल करावा. दरवर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागते. दरवर्षी विम्यापोटी २० रुपये तुमच्या खात्यातून बँक ही कपात करेल.

अटी काय आहेत१) अपघात विमा न नोंदवलेले नागरिकांचा यात समावेश होतो.२) १८ ते ७० वयोगटातील सर्व व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.३) विमा काढणाऱ्या व्यक्तीचे त्या बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.४) योजनेसाठी वार्षिक हप्ता २० रुपये असून तो दरवर्षी विमाधारकांच्या बँक खात्यातून आपोआप वर्ग होईल.५) हप्त्यासाठी आर्थिक वर्ष १ जून ते ३१ मे असणार आहे.

विमा आवश्य काढाप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे केंद्र सरकारने नागरिकांसाठी मोठे सुरक्षा कवच दिले आहे. वर्षाला २० रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी हा विमा काढावा.- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँक