शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे; विद्यापीठात आजपासून प्रवेश प्रक्रिया, ऑनलाइन नोंदणी गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:50 IST

यंदाही प्रवेशासाठी ‘सीईटी’ होणार नसून, पदवीच्या गुणवत्तेवरच सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ४५ विभागांमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ ते ३० जूनच्या दरम्यान विद्यार्थ्यांना ई-समर्थ पोर्टलद्वारे प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. यंदाही प्रवेशासाठी ‘सीईटी’ होणार नसून, पदवीच्या गुणवत्तेवरच सर्व अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.

कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी विद्यापीठ परिसर आणि धाराशिव उपपरिसर येथील प्रवेशासाठी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. प्रकुलगुरू डॉ.वाल्मीक सरवदे यांच्यासह प्रवेश समितीच्या सदस्यांनी वेळापत्रक तयार केले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदवीधर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी २००, तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार आहे. ५ ते ३० जून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंर नोंदणीची माहिती १ जुलै रोजी विभागांकडे सुपुर्द करण्यात येईल. त्यानंतर, विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत संबंधित विभागांत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. १४ जुलै रोजी कागदपत्रांची छाननी पूर्ण होईल. १७ जुलै रोजी सर्व सामान्य गुणवत्ता यादी जाहीर होईल. आक्षेपासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली असून, सुधारित गुणवत्ता यादी २१ जुलै रोजी जाहीर होईल. त्यानंतर, २२ जुलै रोजी निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैच्या दरम्यान प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत.

२ हजारांवर जागा उपलब्धविद्यापीठाच्या एकूण ५१ पैकी विद्यापीठ परिसरात ४३ विभागांत पदव्युत्तरच्या एकूण ५४ अभ्यासक्रमासाठी २ हजार २२८ प्रवेश क्षमता आहे. त्याशिवाय या वर्षी काही नवीन अभ्यासक्रम मंजूर झाले, तर पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र असे ६० अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती उपकुलसचिव माधव वागतकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र