शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यांमधून दर्शविले पाण्याचे महत्त्व

By admin | Updated: April 16, 2016 01:41 IST

परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी रात्री परभणी शहरातून विविध जयंती मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांनी महत्त्व

परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी रात्री परभणी शहरातून विविध जयंती मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये बाबासाहेबांनी महत्त्व विषद केलेल्या नदीजोड प्रकल्प व पाण्याचे महत्त्व यावर देखावे सादर करण्यात आले. विशेषत: सम्राट मित्र मंडळाचा देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात सायंकाळी ५ वाजेपासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. शहरातील विविध भागातून आलेल्या मिरवणुका शिवाजी चौकात एकत्र येऊन तेथून गुजरी बाजार, क्रांतीचौक, स्टेशनरोड मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात दाखल होत होत्या. येथे दाखल झाल्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान विविध जयंती मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले होते. सम्राट मित्र मंडळाने दुष्काळाच्या प्रश्नावर उत्कृष्ट देखावा सादर केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नदीजोड प्रकल्पाचे सांगितलेले महत्त्व या संदर्भातील संकल्पना या जयंती मंडळाने सादर केली. वेगवेगळ्या नद्यांची जोडणी केल्यानंतर त्यांचे वाहणारे पाणी व त्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असा देखावा या मंडळाचा होता. हडको येथील अजिंठानगर जयंती मंडळानेही दुष्काळ व नदीजोड प्रकल्प ही संकल्पना मांडून देखावा सादर केला. रविराज पार्क, पार्वतीनगर व सुयोग कॉलनी या संयुक्त जयंती मंडळाने ‘जल है तो कल है’, ही संकल्पना सादर केली. त्यामध्ये २०१६ ची दुष्काळी परिस्थिती व पाण्याची बचत केल्यानंतर २०१७ मध्ये दिसणारे निसर्गाचे हिरवेगार चित्र हे देखाव्यातून सादर करण्यात आले. तसेच देशातील संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ असल्याचाही देखावा राहुलनगर येथील जयंती मंडळाने सादर केला. ‘९ कोटींचा राजा’ हा आकर्षक देखावा नवजीवन कॉलनी भागातील जयंती मंडळाने सादर केला. रघुदास सोसायटी मंडळाने राजसिंहासनावर विराजमान झालेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर असा देखावा सादर केला. पंचशीलनगर येथील जयंती मंडळाने संसद भवनाचा देखावा सादर केल होता. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, भारतीय बौद्ध महासभा, विष्णू नवले पाटील मित्र मंडळ, संबोधी मित्र मंडळ, मनपा यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शहरातील मिरवणुकींचा समारोप मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास झाला. (प्रतिनिधी)