शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

पितृपक्षात मोहाच्या पत्रावळीस महत्व; छत्रपती संभाजीनगरात रोज २५ हजार पत्रावळींची विक्री

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 6, 2023 16:54 IST

मोहाची झाडे फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे पक्ष पंधरवड्यात शेकडो महिलांना हंगामी रोजगार मिळतो.

छत्रपती संभाजीनगर : सध्या पितृपक्ष सुरू असून,या काळात पूर्वजांच्या नावे श्राद्ध केले जाते, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, असे मानले जाते. यासाठी पिंडदान केले जाते. हे पिंड ठेवण्यासाठी सोने-चांदी-स्टीलचे ताट किंवा केळीची पाने लागत नाहीत, तर चक्क मोहाच्या झाडाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळीचा वापर केला जाते. यामुळे मोहाच्या पत्रावळीला मागणी वाढली असून, शहरात दररोज २५ हजारांपेक्षा अधिक पत्रावळी विकल्या जात आहेत.

जिल्ह्यात मोहाची झाडे फुलंब्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे पक्ष पंधरवड्यात शेकडो महिलांना हंगामी रोजगार मिळतो. याच तालुक्यातून शहरात दररोज २५ ते ३० हजार पत्रावळी विक्रीसाठी आणल्या जातात. सुपारी हनुमान रोड, गारखेड्यातील गजानन महाराज मंदिर चौक, टीव्ही सेंटर चौक येथे पत्रावळी विक्रेते बसतात. पूर्वजांना जेऊ घातले जात असले तरी त्यातून अनेकांना हंगामी रोजगार मिळतो, हे विशेष.

मोहाची पत्रावळी व द्रोण २० रुपयांतमोहाच्या पत्रावळी याच पितृपक्ष पंधरवड्यात दिसून येतात. त्यानंतर वर्षभर या पत्रावळ्या दिसतही नाहीत. मागील वर्षी १० रुपयांना मिळणारी पत्रावळी सध्या १५ रुपयांना एक नग मिळत आहे. त्यासोबत एक द्रोण ५ रुपयांना म्हणजे पत्रावळी व द्रोण २० रुपयात विकले जात आहे. कोरोनाआधी मोहाची पत्रावळी ५ रुपयांना एक मिळत असे, अशी माहिती होलसेल विक्रेते एकनाथ काथार यांनी दिली.

मोहाची पत्रावळीच का?धर्मशास्त्रात पितरांच्या भोजनाला पात्र कसे असावे? पितळ, कास्य, लोह (स्टील) यांचे ताट श्राद्धाला निषिद्ध मानलेले आहे. कास्य, पितळाच्या ताटात पितर जेऊ घालू नयेत. कन्या राशीत सूर्य असतो तेव्हा पितृपक्ष सुरू होतो. अशा वेळेस केळीच्या पानांचाही ‘निषेध’ सांगितलेला आहे. यामुळे मोहाच्या पानाची पत्रावळी चालते.- वेदमूर्ती सुरेश केदारे गुरुजी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादspiritualअध्यात्मिक