औंढा नागनाथ : जवळा बाजार येथून कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या १०७ जनावरांची सुटका ग्रामस्थांसह काही कार्यकर्त्यांनी केली आहे. परभणी-हिंगोली राज्य रस्त्यावर दुपारी २.३० च्या सुमारास जनावरांसह ४ ट्रकच्या चालकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. जि.प.चे कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, विठ्ठल मगर, माऊली झटे, दत्तराव दराडे, रामप्रसाद पाटील, बबन दुधाटे, ममलेश देशमुख, अनिल देव, पांडु नागरे, नंदू खंदळे, गंगा नागरे, गणेश कुरवाडे, दत्ता सांगळे, सुधाकर जायभाय यांच्यासह अनेक कार्यकर्ते हट्टा येथे आयोजित शिवसेनेच्या बैठकीला जात होते. या दरम्यान परभणी-हिंगोली राज्य रस्त्यावरून ४ ट्रकमध्ये जनावरे घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने त्यांनी आडगाव रंजे. ते हट्टा दरम्यान वाहने थांबवून जनावरे कुठे घेऊन जात आहात? अशी विचारणा केली असता चालकांनी समाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी ट्रक क्र. एम.एच.०४- एफडी ८६४८, एम.एच. २६- एच. १६०२, एम.एच.१६- ५३४६ व एम.एच १४- एफ. १६१५ या वाहनांमध्ये खचाखच जनावरे भरलेली निदर्शनास आली. ही जनावरे जवळा बाजार येथून खरेदी करून परभणी येथील कत्तलखान्याकडे नेली जात असल्याचे ट्रकचालकांनी सांगितले. त्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे फौजदार जमील, जमादार चोंढे, क्षीरसागर, किशोर पोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन वाहने व जनावरांचा पंचनामा केला. ट्रक चालकाकडे कुठल्याही प्रकारचा परवाना नसल्याने कार्यकर्त्यांनी सदरील ट्रकमधील ७४ गायी, ५ म्हशी, १७ गोऱ्हे व ११ वघारे अशी एकूण १०७ जनावरे औंढा येथील साई गोशाळेमध्ये आणून सोडली. याबाबत हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (वार्ताहर)गुरांची केली सुटका रविवारी जवळा येथे गुरांचा बाजार असतो. त्याठिकाणी खरेदी केलेली जनावरे परभणीच्या कत्तलखान्याकडे नेली जात होती, असे ट्रकचालकांनी सांगितले. काही कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी वाहने थांबवून जनावरांची सुटका करण्यात आली.
ट्रकद्वारे जनावरांची अवैध वाहतूक
By admin | Updated: July 21, 2014 00:26 IST