शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूरमध्ये अवैध धंद्यावर जरब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:06 IST

वैजापूर : तालुक्यातील शिऊर, वीरगाव व वैजापूर या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘अवैध धंदे जोरात’ या मथळ्याखाली शनिवारी वृत्त ...

वैजापूर : तालुक्यातील शिऊर, वीरगाव व वैजापूर या तीनही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘अवैध धंदे जोरात’ या मथळ्याखाली शनिवारी वृत्त प्रसिद्ध होताच खंडाळा परिसरातील सर्व अवैध धंदे शनिवारी दिवसभर बंद असल्याचे चित्र दिसून आले. पोलिसांनी वृत्ताची दखल घेऊन सर्वत्र शोधमोहीम हाती घेतली. त्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आले नाही. अर्थात हीच परिस्थिती कायम राहणार की पोलीस माघारी फिरताच पुन्हा अवैध धंदेवाले डोके वर काढणार आहेत, याबाबत मात्र अनिश्चितता आहे.

‘लोकमत’ प्रतिनिधीने तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत शुक्रवारी शिऊर, वीरगाव व वैजापूर येेथे स्टिंग ऑपरेशन केले. यात मटका, पत्त्यांचे अड्डे, अवैध दारू व गुटख्याची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे वाळू तस्कर तालुक्यात सुसाटपणे वाळूची विक्री करीत असल्याचे दिसून आले. खंडाळा बसस्थानकाच्या पाठीमागील वट्यावर खुलेआम मटक्याचा व्यवसाय सुरू होता. ‘लोकमत’ने हे स्टिंगद्वारे समोर आणले असता पोलिसांनी शनिवारी सगळीकडे तपासणी सुरू केली. त्यात सर्वच अवैध धंदे बंद असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही बाब चांगली आहे, तरी देखील हे किती काळ कायम टिकणार आहे, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

---------

तक्रारीची नाही घेतली जात दखल

स्थानिक पोलिसांच्या मूक संमतीमुळेच सर्व काही आलबेल सुरू आहे. गेल्या काही दिवसांतील मटका, पत्त्यांचे डाव, दारू व अवैध गुटखा विक्रीचे वाढलेले गुन्हे पाहता अवैध धंदे किती जोमाने वाढले याची प्रचिती येते. सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेतली जात नाही, त्यामुळेच अवैध धंद्यांना अधिक चालना मिळ‌ू लागली आहे, हे देखील सत्य नाकारता येणार नाही. बातमी प्रकाशीत होताच एक दिवस कारवाई करण्यासाठी बाहेर पडायचे, एरव्ही निवांत बसायचे हे काही योग्य ठरणार नाही. त्यामुळे ठाणे प्रमुखांना जातीने लक्ष घालून अवैध धंद्यांच्या पाठीमागील शक्तीवर जरब बसवावा लागणार आहे.

-----------

फोटो : कॅप्शन

वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील बस स्थानकामागे ओट्यावर बसून खुलेआम मटका घेताना शुक्रवारी दिसून आले. शनिवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच या ओट्यावर कोणीही फिरकले नाही, तर चहाच्या हॉटेलमध्ये सर्व काही बंद दिसून आले.