नवीन नांदेड : काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने घरगुती वापरातील ६ हजार रूपये किमतीच्या १२० लिटर निळ्या रॉकेलचा अवैध साठा नांदेड ग्रामीण पोलिसांनी २ सप्टेंबरच्या रात्री सिडकोतून जप्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका महिलेसह दोन आरोपींना गजाआड केले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे व त्यांचे विशेष शोध पथकातील पोलिस कर्मचारी हे २ सप्टेंबर रोजी रात्री सात ते आठच्या सुमारास ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान, एका गुप्त बातमीदाराने नांदेडच्या हडको भागातील ज्ञानेश्वर- नगर येथील आॅटोचालक मेडेवार हे घरगुती वापरातील निळ्या रॉकेलचा अवैधरित्या साठा केल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती समजताच पो. नि. शिंदे व त्यांचे सहकारी ज्ञानेश्वरनगरातील आॅटोचालक संतोष दत्तात्रय मेडेवार व सुलोचनाबाई गंगाराम निलपत्रेवार यांच्या राहत्या घरी धाड टाकली. याप्रसंगी पोलिस निरीक्षक शिंदे यांना आरोपींच्या घरात अनुक्रमे ७० व ५० असे एकूण १२० लिटर निळया रॉकेलचा अवैध साठा आढळून आला. पोलिसांनी जप्त केलेल्या १२० लिटर रॉकेलची किंमत सहा हजार रूपये असल्याची माहिती ठाणे अंमलदार गोत्राम यांनी दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संपत सखाराम शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीआधारे ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी संतोष मेडेवार व सुलोचनाबाई निलपत्रेवार या दोघांच्या विरूद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर ) सिडकोत अतिक्रमणनवीन नांदेड - सिडकोतील मुख्य रस्त्यावर किरकोळ व्यापारी व हातगाडेवाले यांचे अतिक्रमण वाढल्याने येथील वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे़
रॉकेलचा अवैध साठा जप्त
By admin | Updated: September 4, 2014 00:20 IST