शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

‘सर्वोपचार’च्या जागेत काळी-पिवळीचा अवैध थांबा

By admin | Updated: November 16, 2014 23:38 IST

लातूर : तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या परिसरात आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी वाहनांचा अवैध थांबा झाला आहे.

लातूर : तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या परिसरात आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी वाहनांचा अवैध थांबा झाला आहे. याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दुर्लक्ष असून, इमारत परिसरात तासन्तास ही वाहने थांबलेलीच असतात.जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर स्त्री रुग्णालय व या रुग्णालयाची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत झाली. तेव्हापासून या जागेचा वापर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे. परंतु, सध्या तत्कालीन कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयाच्या या जागेत ना दवाखाना ना रुग्णालय, अशी स्थिती आहे. परंतु, काळी-पिवळीच्या वाहनांची मात्र सोय झाली आहे. काही महिन्यांपूर्वी या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाचा आंतर व बाह्यरुग्ण वॉर्ड होता. सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषध भांडार या इमारतीत आहे. महाविद्यालय प्रशासनाचे या इमारतीकडे दुर्लक्ष असल्यामुळे काळी-पिवळी वाहनांना मात्र रान मोकळे झाले आहे.मध्यंतरी काही दिवस याच इमारतीत नर्सिंग महाविद्यालय चालविण्यात येत होते़ या महाविद्यालयातील संगणक चोरी झाल्यानंतर ही जागा रिकामी केली़ नर्सिंग महाविद्यालय हे आता वॉर्डामध्ये चालवण्यत येत आहे़ तेव्हापासून ही जागा रिकामीच आहे. दोन महिन्यापूर्वीच या जागेत आरोग्य विभागाने औषध भांडार सुरु करण्यात आले आहे़ ही जागा जरी सर्वोपचार रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मालकीची असली तरी, सद्य:स्थितीत आरोग्य विभागाच्या ताब्यात आहे. काळी-पिवळी वाहनधारक बिनधास्तपणे याच ठिकाणावरुन प्रवासी घेतात. विशेष म्हणजे प्रवाशांनाही हा काळी-पिवळीचा परमंट थांबा माहीत झाला आहे. त्यामुळे जणू काही बसस्थानक असल्याचे समजून प्रवासीही जुन्या कस्तुरबा गांधी स्त्री रुग्णालयात येतात. हा अनाधिकृत थांबा सार्वजनिक आरोग्य विभागाचे व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी दररोज पाहतात. मात्र त्यांना हा अनाधिकृत थांबा दिसत नसल्याचेच दिसते. (प्रतिनिधी)या इमारतीच्या बाजूला पाच-दहा फुटांवरच जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यालय आहे. पूर्वी आरोग्य उपसंचालकांचे कार्यालय तेथे होते. आता जिल्हा शल्य चिकित्सकांना आणि पूर्वी आरोग्य उपसंचालकांनाही हा थांबा दिसला नाही. महाविद्यालयाला तर तो दिसतच नाही. विशेष म्हणजे ही जागा खाली करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग सार्वजनिक आरोग्य विभागाला वारंवार पत्र देते. परंतु, अवैध थांबाधारकांना मात्र साधी समजही ‘सर्वोपचार’कडून दिली जात नाही. त्यामुळे काळी-पिवळीधारक राजरोसपणे येथे थांबत आहेत.