शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

समाजसेवेच्या नावाखाली बेकायदेशीर ‘लकी ड्रॉ’

By admin | Updated: May 4, 2017 23:19 IST

बीडतुम्हाला घर हवं असेल, फ्लॅट हवा असेल किंवा महागडी चार चाकी हवी असेल तर अवघ्या बाराशे रूपयात ती तुम्हाला मिळू शकते.

प्रताप नलावडे बीडतुम्हाला घर हवं असेल, फ्लॅट हवा असेल किंवा महागडी चार चाकी हवी असेल तर अवघ्या बाराशे रूपयात ती तुम्हाला मिळू शकते. सोफा, डायनिंग टेबल आणि अगदी वॉशिंग मशिनपासून फ्रीजपर्यंतची कोणतीही वस्तू तुम्हाला याच किमतीत मिळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला जिल्ह्यात सुरू असलेल्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता आहे. कोट्यावधी रूपयांच्या बक्षीसांच्या लोकांना भुलवणाऱ्या लकी ड्रॉ योजनांचा सध्या सुळसुळाट आहे. लोकांना अमिष दाखूवन अक्षरश: त्यांची लूट बेकायदेशीरपणे केली जात असतानाही शासकीय यंत्रणेची मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक होताना दिसत आहे. फ्लॅटपासून ते महागड्या चार चाकी पर्यंतच्या बक्षीसांचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे जमा करण्यात आल्याने आणि अनेकांना बक्षीसेही दिले नसल्याच्या तक्रारी कूपन खरेदी करणारांकडून होऊ लागल्या आहेत. गृहोपयोगी वस्तूंची विक्री करण्याच्या आडून लकी ड्रॉचा धंदा केला जात आहे.माजिक संस्थेची नोंदणी फक्त करायची आणि त्या नोंदणी क्रमांकाच्या आधारावरच ड्रॉसाठी कोणतीही शासकीय परवानगी न घेता खुलेआम लकी कुपनची विक्री करायची, असा गोरखधंदाच काहींनी सुरू केला आहे. कोणत्याही संस्थेला सामाजिक कार्यासाठी निधी उभा करायचा असेल तर लकी ड्रॉ काढता येतो. परंतु त्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असते. शिवाय ड्रॉ कोणत्या स्वरूपात काढण्यात येणार आहे, त्यातून जमलेला निधी कोणत्या कार्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे, याची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. शिवाय, पोलीस स्टेशनकडेही माहिती देणे आणि त्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात अनेकांनी सामाजिक कार्याआडून रग्गड कमाई करण्याचा सहज सोपा मार्ग म्हणून या ड्रॉचा उपयोग बेकायदेशीरपणे सुरू केला आहे. कोणतीही परवानगी न घेता आणि शासकीय नियमाला धाब्यावर बसवत ड्रॉचे आयोजन करून लाखो रूपयांची माया गोळा केली आहे.