शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदाच पण जोरात...

By admin | Updated: June 3, 2016 23:45 IST

औरंगाबाद : राज्यात गुटखा उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी असली तरी औरंगाबाद शहरात त्याला बंदी नाही.

औरंगाबाद : राज्यात गुटखा उत्पादन आणि विक्रीसाठी बंदी असली तरी औरंगाबाद शहरात त्याला बंदी नाही. म्हणजे कागदोपत्री बंदी असली तरी बसस्थानक, औरंगपुरा, गारखेड्यासह शहरातील अनेक भागांत गुटख्यांची सर्रास विक्री चालू असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या स्ंिटग आॅपरेशनमध्ये समोर आले. गुटखा विक्रीला बंदी असली तरी अन्न व औषधी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे किंवा कारवाईची कोणतीही भीती न राहिल्यामुळे ही विक्री चालू असल्याचे समोर आले. गुटख्याच्या विक्रीबाबत तक्रारी आल्यानंतर याची शहानिशा करण्यासाठी ‘लोकमत’ने यासंबंधीची छुप्या पद्धतीने पाहणी केली असता गुटखा विक्री चालू असल्याचे स्पष्ट झाले. बसस्थानक परिसरात अनेक पानटपऱ्यांवर गुटख्यांची उघडपणे विक्री होत असल्याचे दिसले. लोकमत प्रतिनिधीने बसस्थानकाच्या समोरील एका पानटपरीवर गुटख्यांची चौकशी केली असता त्याच्याकडे हिरा आणि आरएमडी या गुटख्यांच्या पुड्या असल्याचे आढळले. त्याच भागातील अन्य एका टपरीवर चौकशी केली असता ओळखीचे असल्याशिवाय गुटखा दिला जात नसल्याचे विक्रेत्याने स्पष्ट केले. तेथून मिलकॉर्नरच्या दिशेने असणाऱ्या एका टपरीवर हिरा, आरएमडी मिक्स, गोवा या गुटख्यांच्या पुड्या सर्रास विक्रीस असल्याचे दिसले. औरंगपुरा शहर बसस्थानक परिसरातील नाल्याच्या बाजूने असणाऱ्या एका पानटपरीवर माणिकचंद गुटख्याची चौकशी केली असता तेथे मिळाला नाही, मात्र त्याची एका पुडीची किंमत ३५ रुपये असल्याचे विक्रेत्याने सांगितले. हिरा आणि गोवा मात्र मिळतो, असेही स्पष्ट केले. या परिसरात महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांची रेलचेल असते. सर्रास सर्व व्यक्तींना किंवा विद्यार्थ्यांना गुटखा दिला जात नाही, मात्र ओळखीचे किंवा नेहमीचे गिऱ्हाईक असणाऱ्यांनाच गुटख्याची विक्री होेते. जळगाव टी पॉइंट, बीड बायपास आदी ठिकाणीही विक्री होत असल्याची माहिती पानटपरी चालकांकडूनच मिळाली. गारखेडा परिसरातील एका पानटपरीचालकाकडे हिरा गुटखा विक्रीस असल्याचे आढळले. मात्र, ही विक्री छुपेपणाने चालत असल्याचे दिसले. तर शिवाजीनगर रोडवरील एका टपरीवर चौकशी केली असता आपण गुटखा ठेवत नसल्याचे हा विक्रेता म्हणाला. याच विक्रेत्याजवळ अधिक चौकशी केली असता गुटखा ठेवणे परवडते आणि परवडतही नाही. अन्न व औषध प्रशासनाकडून कधी टपरीवर गुटखा विक्री होत असल्यासंदर्भात कधी चौकशी केली का, असे विचारले असता मला टपरी टाकून दोन वर्षे होत आली, मात्र अशी कोणतीही चौकशी झाली नसल्याचे या विक्रेत्याने स्पष्ट केले. बीड बायपासवरील एका पान विक्रेत्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीही चौकशी मागील पाच- सहा महिन्यांत तरी झाली नसल्याचे त्याने सांगितले. मात्र पोलिसांची भीती असते. सर्रास विक्रीअधिक माहिती घेतली असता गुटख्याची विक्री चोरीछुपे करावी लागत असल्याने त्याची अधिक किंमत घेऊन विक्री होत आहे. यातून पानटपरीचालकाला मोठा फायदा होत असतो. त्यामुळे बंदी असली तरी याची सर्रास विक्री होत असल्याचे समोर आले.एका पुडीची किंमत ३५ रुपये औरंगपुरा शहर बसस्थानक परिसरातील नाल्याच्या बाजूने असणाऱ्या एका पानटपरीवर माणिकचंद गुटख्याची चौकशी केली असता तेथे मिळाला नाही, मात्र त्याची एका पुडीची किंमत ३५ रुपये असल्याचे विक्रेत्याने सांगितले. कारवाईची धास्ती नाहीमागील दोन महिन्यांत शहरात छुप्या पद्धतीने गुटखा विक्री करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कारवाईची भीती नसल्यानेही शहरात गुटख्यांची खुलेआम आणि अधिक दराने विक्री होत असल्याचे समोर आले आहे. शाळा परिसरातही ही विक्री चालू असल्याचे दिसते.