शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वीटभट्ट्यांना अभय

By admin | Updated: June 24, 2014 01:09 IST

नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, म्हसोबाची वाडी, वाहेगाव, अगरकानडगाव, ममदापूर, बगडी आदी ठिकाणी अवैध वीटभट्ट्यांना एकप्रकारे अभय मिळाले

नेवरगाव : गंगापूर तालुक्यातील नेवरगाव, हैबतपूर, म्हसोबाची वाडी, वाहेगाव, अगरकानडगाव, ममदापूर, बगडी आदी ठिकाणी अवैध वीटभट्ट्यांना एकप्रकारे अभय मिळाले असून, विटांसाठी लागणाऱ्या मातीची गोदाकाठावरून मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. वीट भट्ट्यांतून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.विशेष म्हणजे जायकवाडीसाठी संपादित केलेल्या जमिनीतून हजारो ब्रास माती अहोरात्र ट्रॅक्टर आणि डंपरद्वारे नेली जात आहे. हे वीटभट्टीचालक ५० ते १०० ब्रासची रॉयल्टी भरतात आणि उपसा मात्र ४ ते ५ हजार ब्रास करीत आहेत.त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. काही वीटभट्टीचालक तर रॉयल्टी न भरताच मातीचा उपसा करीत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाला या बाबीची माहिती आहे. त्यामुळे या भागात किती वीटभट्ट्या आहेत? किती जणांनी रॉयल्टी भरली याची सर्व माहिती तलाठ्याकडून मागवून संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.प्रशासनाच्या दुुर्लक्षामुळे माती चोरांचे चांगलेच फावले असून नदीकाठच्या जमिनीची मात्र चाळणी होत आहे. (वार्ताहर)वाळूची तस्करीपरिसरात मातीसोबतच गोदाकाठातून वाळूचीही मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे. वाळू तस्करीला प्रशासनाचा वरदहस्त असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. वाळू तस्करांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाळूचे साठे करून ठेवले आहेत. या वाळू तस्करांवरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.