शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

बेकायदा अटक : तक्रारदार आणि पोलिस निरीक्षकांना दंड; न्यायालयाचे सरकारी वकील, दंडाधिकाऱ्यांवरही ताशेरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 09:07 IST

अटकेनंतर कायद्याची कलमे लावण्यात चूक झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. 

- डॉ. खुशालचंद बाहेतीछत्रपती संभाजीनगर : चुकीची कलमे लावून  बेकायदा अटक प्रकरणी २ लाख भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हिंगोलीच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. अश्विनकुमार सानप  यांना हिंगोली शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांसह इतर कलमांनुसार दाखल गुन्ह्यात अटक झाली. आश्विनकुमार यांनी बासंबा (जि. हिंगोली) पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल पंडित तारे यांना एका महिलेबद्दल आक्षेपार्ह व्हॉट्सॲप मेसेज पाठवला होता. तारे यांनी सरकारतर्फे नव्हे तर वैयक्तिक तक्रार दाखल केली.  अटकेनंतर कायद्याची कलमे लावण्यात चूक झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. 

आश्विनकुमार यांना न्यायालयात हजर करताना पोलिसांनी कलम ६६-अ आणि ६६-ब कमी करून ६७ अ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात लैंगिक संदेश प्रकाशित करणे) लावण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल दिला. न्यायालयाने आश्विनकुमारला  जामीन दिला. त्यानंतर खटला रद्द आणि नुकसानभरपाईसाठी आश्विनकुमार यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला.  

तक्रारदार तारे आणि पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांना वैयक्तिकरीत्या  प्रतिवादी केले. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ अ २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवले आहे. कलम ६६-ब संगणक संसाधन अप्रामाणिकपणे प्राप्त करण्याशी संबंधित असल्याने ही कलमे लागत नसल्याचे व ५०० आयपीसी अदखलपात्र आहे. एफआयआरवरून कलम ६७ अ लागत नाही, असे म्हणत  न्यायालयाने गुन्हा रद्द केला. 

न्यायालयाची निरीक्षणे- अटक घटनाबाह्य आणि बेकायदा होती.- मोबाइलवर मेसेज असताना घटनास्थळाचा पंचनामा का व कोणत्या जागेचा केला, हे समजत नाही.- अटक कायदेशीर आहे का हे तपासण्याकडे दंडाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. - अटक कायदेशीर आहे की नाही, हे पाहणे सरकारी वकिलांचेही कर्तव्य असून जामीन अर्जावर आक्षेप घेणे अनावश्यक होते.  

भरपाईचे आदेश अटक करताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. ४१(१) अ सीआरपीसीची नोटीस दिली नाही म्हणून पोलिस निरीक्षक पाडळकर यांनी आश्विनकुमार यांना दोन लाख व तक्रारदार तारे यांनी ५० हजार भरपाई देण्याचे आदेश दिले. न्या. एस. जी. चपळगावकर आणि न्या. विभा कंकणवाडी यांनी याबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. 

टॅग्स :Courtन्यायालय