शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्वास चित्रपटाची कथा प्रत्यक्षात; ब्रेनट्यूमरमुळे अंधत्व आलेल्या नातीसाठी आजोबाची धडपड

By संतोष हिरेमठ | Updated: August 25, 2022 19:59 IST

‘आजोबा, मला फक्त अभ्यास करता येत नाही, लिहिता येत नाही’

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : ‘श्वास’ चित्रपटात एक आजोबा आपल्या कॅन्सरग्रस्त नातवाला बरे करण्यासाठी जिवाची बाजी लावतात. अगदी या चित्रपटातील आजोबांप्रमाणे औरंगाबादेतील एक आजोबा ब्रेनट्यूमरमुळे अंधत्व आलेल्या आपल्या ८ वर्षाची नात ‘आराध्या’साठी धडपडत आहेत. अशा परिस्थितीतही ‘आजोबा, मला सगळं करता येते, फक्त अभ्यास करता येत नाही, लिहिता येत नाही...’ अशी खंत ही चिमुकली व्यक्त करते.

जागतिक नेत्रदान पंधरवडा प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी आमखास मैदानासमोरील जिल्हा नेत्र विभागात या आजोबांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिला. प्रल्हाद शेलार (रा. जांभळा, ता. गंगापूर) असे या आजोबांचे नाव आहे. त्यांच्यासोबत त्यांची नात आराध्या होती. साडेतीन वर्षांची असताना आराध्याला ब्रेन ट्यूमर झाला. ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया होईपर्यंत आराध्याला सर्व काही दिसत होते. मात्र, ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ दिवसांनंतर तिची दृष्टी गेली. सगळ्या कुटुंबावर जणू दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर तिच्या दृष्टीसाठी अनेक डाॅक्टरांना दाखविले, आराध्या इयत्ता दुसरीत आहे. परंतु आता तिला अंध मुलांच्या शाळेत टाकायचे आहे. त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र लागणार असल्याने बुधवारी जिल्हा नेत्र रुग्णालयात आले होते.

दृष्टी परत मिळावी...जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डाॅ. संतोष काळे, नेत्रदान समुपदेशक दत्ता बढे यांच्या उपस्थितीत प्रल्हाद शेलार यांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिला. आपल्या नेत्रदानामुळे कोणाला तरी दृष्टी मिळाली, तर त्यापेक्षा मोठा आनंद नाही, असे प्रल्हाद शेलार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.

‘मला डाॅक्टर व्हायचे....’दृष्टी नसतानाही आपल्याला दिसत नाही, याची जाणीवच आराध्या कोणाला होऊ देत नाही. कविता, पाढे तिला तोंडपाठ आहे. दिसत नसले तरी मी सगळं करू शकते, मला जर दिसू लागले तर मला लिहायचे आहे, डाॅक्टर व्हायचे आहे, असे आराध्या म्हणाली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर