शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अर्थसंकल्पात विद्यार्थी सुविधांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:00 IST

विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे.

विद्यापीठाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प मंगळवारी अधिसभेत मांडला जाणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेला ३२० कोटी ७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प तब्बल ५५ कोटी ४७ लाख रुपये तुटीचा आहे. या अर्थसंकल्पात पुतळे, बांधकाम आदी गोष्टींनाच अधिक प्राधान्य दिले असून, विद्यार्थी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.

विद्यापीठाच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीची माहिती मंगळवारी विद्यापीठ अधिसभेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाली आहे. उत्पन्न आणि खर्चाचा मेळ कुठेही बसलेला नाही. यामुळे अर्थसंकल्पातील तुटीची मर्यादा तब्बल १७.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे. यात विद्यापीठाला एकूण वेतनेतर उत्पन्न २०० कोटी ८८ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

मात्र, याचवेळी वेतनेतर खर्चाची आवश्यकता तब्बल २५६ कोटी ३५ लाख रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे हा संकल्प तब्बल ५५ कोटी ४७ लाख रुपये एवढा तुटीचा असेल. विद्यापीठ प्रशासनाला एकूण खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना दमछाक झाल्याचे या संकल्पावरून दिसते. यात विद्यार्थ्यांच्या पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्प तरतूद केली आहे. मात्र याच वेळी मेमोरियल, पुतळे उभारणी, सुशोभीकरण, बांधकाम आदी बाबींवर कोट्यवधींची तरतूद केली आहे.

विद्यार्थ्यांकडून मिळणार कोट्यवधी; खर्च होणार लाखातअर्थसंकल्पात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कातून सर्वाधिक निधी जमा होणार आहे. हा निधी तब्बल ६३ कोटी ५२ लाख २५ हजार रुपये एवढा आहे. याशिवाय शिक्षण शुल्कापोटी ६ कोटी ६६ लाख, इतर शुल्कातून १९ कोटी ६१ लाख रुपये जमा होणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांसाठीच्या परीक्षा खर्चांवर २३ कोटी १ लाख रुपये, विद्यार्थी विकास मंडळासाठी १ कोटी ६४ लाख, १७ वसतिगृहे व अतिथीगृहांसाठी ३८ लाख ४४ हजार रुपये (यात विद्यार्थी वसतिगृहांसाठी अल्प तरतूद), क्रीडा मंडळासाठी ६९ लाख २० हजार रुपये तरतूद केलेली आहे. याच वेळी विद्यापीठ कार्यालयासाठी १६ कोटी ७७ लाख २५ हजार, विद्यापीठ प्रशासकीय विभागासाठी २ कोटी २८ लाख ३० हजार, विविध मंडळांचे पदाधिकारी, अधिकारी यांच्या प्रवास व वाहन भत्त्यांसाठी १ कोटी ६ लाख रुपये तरतूद केली आहे.

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिलासाविद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त २००८-०९ पासून विद्यापीठ फंडातून पीएच.डी.चे संशोधन करणाºया विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पीएच.डी. संशोधन आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी नव्याने शेतकरी-शेतमजुरांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठीही १ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. मात्र याच वेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाºया केंद्रीय युवक महोत्सव, युवक नेतृत्व शिबीर, विद्यार्थी संसद कार्यक्रम, विविध स्पर्धा, कार्यशाळा, विद्यार्थी सहाय्य निधी, इंद्रधनुष्य, आविष्कार, अश्वमेध, आव्हान आदी उपक्रमांसाठी केवळ १ कोटी दिले आहेत. तर कमवा व शिका योजनेसाठीही अल्प तरतूद केली आहे. ही तरतूद केवळ ६५ लाख रुपये आहे.

टॅग्स :universityविद्यापीठBudgetअर्थसंकल्प 2023Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थी