शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

...तर मिळणार गुंठेवारीचा लाभ

By admin | Updated: November 28, 2014 01:08 IST

हिंगोली : शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित असलेल्या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामांविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमानुकूल पद्धतीने

हिंगोली : शहर विकास आराखड्यानुसार आरक्षित असलेल्या भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामांविषयी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमानुकूल पद्धतीने हा प्रश्न पालिकेने सोडवावा असा आदेश दिला आहे. त्यानुसार गुंठेवारीची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी नगरपालिकेने चालविली आहे.१९९४ च्या शहर विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या विविध भागातील भूखंडावर अनधिकृत बांधकाम झाल्याविषयी जनहित याचिका खंडपीठात दाखल होती. अनेक वर्षे हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी न्यायालयाने यात जिल्हाधिकारी व पालिकेने नियमानुसार पावले उचलत एक वर्षात कार्यवाही करण्याचा आदेश दिला.शहरातील सर्वे क्र. १३, १४, १५, १६, १३६, १३७ आदी संदर्भातील ही याचिका होती. त्यात न.प. व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिन राहून रहिवासी क्षेत्रातील (पिवळा झोन) बांधकामाला गुंठेवारी अ‍ॅक्ट २00१ मध्ये असलेल्या तरतुदीच्या अधिन राहून नियमित करण्याचे आदेशात म्हटले आहे. याव्यतिरिक्त ना-विकास क्षेत्राबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यास आदेशात बजावले आहे. याबाबत मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांनी जाहीर प्रगटन देण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रगटनानुसार या आराखड्यात अनधिकृत बांधकाम केलेल्या रहिवाशांना आपला प्रस्ताव पुराव्यांसह सादर करावा लागणार आहे. त्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. नुकतीच एका शिष्टमंडळाने या प्रश्नाबाबत नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ यांच्या कक्षात येलगट्टे यांच्याशी याबाबत चर्चा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, उपनगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, नगरसेवक नेहालभैया, शेख शकिल, आरीफभाई, न.प.चे अभियंता अशोक पाटील, विनय साहू आदींची यावेळी उपस्थिती होती. (जिल्हा प्रतिनिधी)४विकास आराखड्याच्या आरक्षणाचे उल्लंघन केल्याचे प्रकरण वर्षभरात निकाली काढण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. यातील प्रक्रिया गतिमान करणे गरजेचे आहे. हा जवळपास हजारांवर कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न आहे.४गुंठेवारीचे प्रकरण सादर करताना संबंधितांना योग्य नमुन्यातील अर्ज, भूखंडाच्या मालकीचा व कायदेशिर कब्जाबाबतचा कागदोपत्री पुरावा जसे पी.आर. कार्ड, विद्यमान रेखांकनाचा आराखडा, विद्यमान बांधकाम आराखडा, दुरुस्ती आराखडा, बांधकामाचे नकाशे आदी कागदपत्रे लागणार आहेत. तेव्हाच या प्रकरणाचा विचार होईल.