शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काही करीत नसाल, तर निदान मुले तरी जन्माला घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:00 IST

जे लोक देशासाठी काहीच करीत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : इतर धर्मीयांचे वर्चस्व रोखण्यासाठी व हिंदू धर्माचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालावे. जे लोक देशासाठी काहीच करीत नाहीत त्यांनी किमान मुलांना तरी जन्माला घालावे, असा अजब सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिला. जनूभाऊ रानडे यांचा दहावा स्मृतिदिन व शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मंचावर डॉ. विभाश्री, अंबरीश महाराज, नवनाथ महाराज, डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य, शिवाजी शेरकर, राजीव जहागीरदार, संजय बारगजे आदी उपस्थित होते.संत तुकाराम नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात ‘भगवा रंग त्यागाचा’ या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या, मुलांच्या भरणपोषणाची क्षमता नाही म्हणून एकाच मुलावर थांबण्याचा निर्णय घेऊ नका. बाहेरून आलेल्या कित्येक लोकांना नाही तरी आपण देशात खाऊ-पिऊ घालतच आहोत. तुमच्या मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. हिंदूंची लोकसंख्या वाढली नाही, तर आगामी काळात इतर धर्म अतिक्रमण करून हिंदूंच्या अस्तित्वावर धोका आणतील, असा इशाराही त्यांना दिला.शिवाजी महाराजांनी सहा लग्न केल्याचा दाखला देत प्रज्ञासिंह यांनी देशासाठी एकापेक्षा अधिक लग्नकेले तरी चालेल, असे वक्तव्यकेले. मुलांना बहीण-भाऊनसल्यामुळे आजकाल मुलांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून, आत्महत्या वाढत असल्याचाही निष्कर्ष काढत त्यांनी मुलांच्या संख्येवरून वाद होणे योग्य नसल्याचे म्हटले.विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणा-या महिलांचा यावेळी ‘मातृशक्ती सन्मान’ करण्यात आला. अर्पण पतंगे या शाळकरी विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला, तर पार्थबावस्कर यांनी सूत्रसंचालनआणि हेमंत त्रिवेदी यांनी आभार मानले.भगव्या रंगाला दहशतवादाचा ठपका लावणे एका मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचे सांगत प्रज्ञासिंह यांनी भगवा हा ‘त्याग, समर्पण आणि शौर्याचा’ रंग असल्याचे म्हटले. देशविरोधी आणि मनात कपट बाळगणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रखर राष्ट्रवादाला घाबरतात. भगवा रंग म्हणजे या प्रखर राष्ट्रवादाचे प्रतीक आहे, असेही त्या म्हणाल्या.