शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...तर बिबटे, तडस शहरात येतील !

By admin | Updated: March 18, 2016 01:52 IST

जालना : जेथे माणसाला हंडाभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली तेथे वन्यप्राण्यांची काय गत. पाणीटंचाईच्या झळा मार्चमध्येच तीव्र होत असून,

जालना : जेथे माणसाला हंडाभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली तेथे वन्यप्राण्यांची काय गत. पाणीटंचाईच्या झळा मार्चमध्येच तीव्र होत असून, याचा सर्वाधित फटका वन्य प्राण्यांना बसत आहे. भोकरदन, बदनापूर तालुक्यात हरीण, काळविट, वानर, तडस, बिबटे या प्राण्यांनी पाण्याच्या शोधार्थ आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. बदनापूर तालुक्यातील चनेगावमध्ये दोन दिवसांपूर्वी बिबट्याने दोघांवर केलेल्या हल्ल्यातून वनविभागाने धडा घेण्याची गरज आहे. तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर वन्य प्राणी शहरात दिसल्यास नवल नाही.जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. कडक उन्हामुळे जलसाठे तसेच राना-वनात असलेले पाणवठे कोरडेठाक पडल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ शहराकडे वळत आहेत. हरीण, कोल्हे, लांडगे, मोर, नील गायी आदी विविध प्राणी गाववस्तीकडे येत असल्याने ग्रामस्थही दहशतीखाली आहेत. दोन दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात बिबट्या सदृश्य प्राण्याने दोन जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले होते. जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर वन विभागाचे आठ तालुक्यांत मिळून ९ हजार हेक्टर पेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. वन क्षेत्रात हजारो वन्य प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येते. प्रत्यक्ष आकडेवारीचा अनेकदा मेळ नसल्याने कोणते प्राणी किती याची निश्चित माहिती वनविभागाकडेही उपलब्ध नाही. यंदा झालेल्या अल्प पावसामुळे जंगलांमध्ये असलेले नैसर्गिक तलाव तसेच जलसाठे जानेवारीतच आटले. जालना तालुक्यात ८ पेक्षा अधिक पाणवठे आहेत. यात जालना शहर परिसरात दोन, दरेगाव वन शिवारात ४, हदगाव २, बावणेपांगरी एक असे पाणवठे आहेत. चार तालुके मिळून १४ वनतळे बांधण्यात आली आहेत. गरजेनुसार येथे पाणीपुरवठा केला जातो. उत्तर विभागात जालना, बदनापूर, जाफराबाद व बदनापूर हे तालुके येतात. या चार तालुक्यांत हरणे, कोल्हे, लांडगे, मोर व नील गायी आहे. याची मोजणी नसली तरी हे प्रमाण हजारोंच्या घरात असल्याचे वन अधिकारी एम.आर. निकुंभ यांनी सांगितले. काही सामाजिक संघटनाही वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात मंगळवारी बिबट्या सदृश वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे आला होता. त्याच्या हल्ल्यात दोन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले होते. प्रत्यक्षात हा प्राणी बिबट्याऐवजी तडस असावा, असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी २० वन कर्मचाऱ्यांनी चनेगाव शिवाराचा संपूर्ण परिसर पिंजून काढत या प्राण्याचा शोध घेतला. बुधवारी सकाळी तेथे पिंजरा लावण्यात आला. ४त्या ठिकाणी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या प्राण्याचा कसून शोध घेतला जात आहे. दरम्यान, मंगळवारी चनेगाव येथील ग्रामस्थांनी धाव घेतल्यानंतर बिबट्याने धामणगाव शिवाराकडे धूम ठोकली, असे कडूबा तायडे, अनिल तायडे, कृष्णा घुगे, ज्ञानेश्वर गुळमकर, गणेश मुटकूळे जगन मुटकूळे या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असले तरी वनविभागाचा दावा वेगळा असल्याचे सांगण्यात आले. ४बिबट्या सदृश प्राणी बुलडाणा जिल्ह्यातील धाड वा इतर गावातून तसेच भोकरदनच्या सीमेवरील धावडा, मेहगाव, जाळीचा देव जंगलातून आला असावा. दोन दिवसांपासून रेकी सुरू आहे. लवकरच या प्राण्याचा आम्ही शोध लावू असा दावा वन अधिकारी निकुंभ यांनी केला. चनेगाव शिवारात हिंस्त्र श्वापद लक्षात घेता एकाट्याने फिरू नये गटागटाने जावे, काही आढळ्यास वन विभागाशी संपर्क साधावा.