शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वीज जाणार असेल तर मिळेल सूचना; मोबाइल नोंदणी केली का?

By साहेबराव हिवराळे | Updated: October 19, 2023 19:26 IST

परिमंडळात १३ लाखांपैकी १२ लाख ग्राहकांचे महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंद

छत्रपती संभाजीनगर : वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ''एसएमएस''द्वारे मिळवण्यासाठी परिमंडलातील ९४ टक्के ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदविलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून वीजग्राहकांना या सेवांचा लाभ घेता येऊ शकतो.

आजच्या धावपळीच्या काळात बहुतेक सारे मोबाइल व ऑनलाइनवर विसंबून राहत असल्याने रांगेत थांबण्यापेक्षा क्षणात काम कसे होईल, या सोयीपोटी ग्राहकही या सेवेस प्रतिसाद देत आहेत. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात १३ लाख १८ हजार ७२ वीजग्राहकांपैकी १२ लाख ४० हजार ७१२ ग्राहकांनी महावितरणकडे मोबाइल क्रमांक नोंदविलेला आहे.

एसएमएसवर मिळतात सुविधाया ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.

मोबाइल क्रमांक कसा नोंदवाल?जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा सर्व वर्गवारीतील ९४ टक्के ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरी ज्या ग्राहकांना आपला मोबाइल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा, असे ग्राहक २४ तास सुरू असणाऱ्या १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर मोबाइल क्रमांक व तक्रारही नोंदवू शकतात.

२४ तास सेवामहावितरणच्या संकेतस्थळावर किंवा २४ तास सुरू असलेल्या महावितरण ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे. अनेकजण या सेवेचा लाभ घेत आहेत.- महावितरण अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण