शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आई सुदृढ असेल तर सदृढ बाळ जन्माला येते; कमी वजनाच्या बाळाला धोके काय?

By बापू सोळुंके | Updated: September 5, 2024 20:01 IST

गर्भधारणा होऊन ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी बाळाचा जन्मल्यास बाळाचे वजन कमी असते.

छत्रपती संभाजीनगर: आजकाल विविध कारणांमुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येतात. सुदृढ बाळ जन्माला घालायचे असेल तर आईचे आरोग्यही सुदृढ असणे आवश्यक आहे. रक्तदाब, मधूमेह, थाॅयराईड, रक्ताक्षय असे कोणतेही आजार मातेला असू नये, शिवाय तिचे वयही जास्त असल्यास बाळ कमी वजनाचे जन्मते. आईच्या जिवाला धोका होऊ नये,यासाठी बऱ्याचदा ९ महिन्यापूर्वीच सिझेरियन प्रसूती करण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागतो.

कमी वजनाचे बाळ जन्माला येण्याची ही आहेत प्रमुख कारण?गर्भधारणा होऊन ३७ आठवडे पूर्ण होण्याआधी बाळाचा जन्मल्यास बाळाचे वजन कमी असते.

गरोदरपणात सकस आहार न घेतल्यासगर्भवती स्त्रीने संपूर्ण नऊ महिन्याच्या कालावधीत सकस आहार घेणे महत्वाचे असते. तिने सकस आहार न घेतल्यास गर्भातील बाळाचे पोषण होत नाही. परिणामी बाळ कमी वजनाचे जन्माला येते.

गर्भवतीला रक्तदाब, मधूमेहासह , हृदयासंबंधी आजार, थायरॉईड, रक्तक्षय,सिकलसेल असे आजार असल्यास त्याचे विपरित परिणाम बाळाच्या वाढीवर होते. गर्भातील बाळाचे वजन वाढत नाही. आईच्या जिवाला धोका निर्माण होतो, यामुळे शेवटी ३८ आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच डॉक्टर सिझरियन प्रसूती करण्याचा सल्ला देतात.

कमी वजनाच्या बाळाला धोके काय?प्रतिकारक शक्ती कमीकमी वजनाचे बाळ जन्मल्यास त्याची रोगप्रतिकार क्षकमी कमी असते. परिणामी त्यास जास्त थंडी आणि गर्मीही सहन होत नाही.

कावीळ, न्यूमोनिया होणयाचा धोका :कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यानंतर बाळाला कावीळ, न्यूमोनिया सारख्या आजाराचा धोका असतो. अशावेळी डॉक्टर नवजात अर्भकास तातडीने वार्मरमध्ये ठेवण्याचा सल्ला देतात.

वयाच्या पाच वर्षापर्यंत बालमृत्यूची शक्यता:कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाच्या वयाच्या पाच वर्षापर्यंत त्याचा मृत्यू होण्याचा धोका असतो.अशा बाळांना लवकर जंतूसंसर्ग होतो आणि तो आजारांना बळी पडतो.

काळजी घ्यावीआई सुदृढ असेल तर बाळ सदृढ जन्माला येते. गर्भवती स्त्रिला रक्तदाब, मधूमेह,ह्दय विकार, गर्भारपणात सकस आहार न घेेणे, रक्ताक्षय आदी प्रमुख कारणामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येत असते. कमी वजनाच्या बाळाचा जन्म झाल्यापासून त्याच्या आयुष्याला पाच वर्षापर्यंत धोका असतो. यामुळे बाळ कमी वजनाचे येऊ नये, यासाठी काळजी घ्यावी.- डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभाग प्रमुख, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र. घाटी रुग्णालय.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpregnant womanगर्भवती महिला