लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : भाजप ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे हयात असते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कदाचित सत्तेतून बाहेर पडावे लागले नसते, असे वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मंगळवारी वडीगोद्री येथे पत्रकार परिषदेत सांगितले.तुपकर सध्या मराठवाडा दौºयावर आहेत. वडीगोद्री येथे ते म्हणाले, की गोपीनाथ मुंडे यांना शेतकºयांच्या प्रश्नांची जाण होती. ते हयात असते तर अडीच- तीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकºयांचे बरेच प्रश्न मार्गी लागले असते. या सरकारसाठी मते मागण्यात आम्ही आघाडीवर होतो. पण या सरकारला शेतकºयांचे दु:ख कळले नाही. आम्ही महायुती तोडली आहे. ‘स्वाभिमानी’ला कोणत्याही वांझोट्या मंत्रीपदात स्वारस्य नसून आम्हाला केवळ शेतकरी हित जपायचे आहे. शेतकºयांना न्याय मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत राहिल, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे, तालुका अध्यक्ष राजू खटके, पांडुरंग गावडे, राजेंद्र खटके, पांडुरंग गावडे, अजिंक्य खटके आदी उपस्थित होते.
मुंडे असते तर सत्तेतून बाहेर पडावे लागले नसते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:53 IST