शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

एकदा नापास तरीही आयडियल

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

नितीन कांबळे , कडा आष्टी तालुक्यातील धामणगाव सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेलं पोरगं

नितीन कांबळे , कडाआष्टी तालुक्यातील धामणगाव सारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेलं पोरगं, दहावीत पाच वेळा नापास झाल्यावर शेजारी पाजारी त्याला पाहून नाक मुरडायचे. मात्र पदरी पडलेल्या अपयशाची तमा न बाळगता शिक्षणाची चिकाटी कायम ठेवून हेच पोरगं पुढे जाऊन साहित्यातलं डॉक्टरेट होते. अन् नाक मुरडणाऱ्यांच्या नाकावर टिचून स्वत:ला सिध्द करून दखवतं. दहावी बारावीज नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयडियल’ असलेल्या प्रा. डॉ. नवनाथ दत्तोबा चौधरीचा आढावा.आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी दत्तोबा चौधरी यांच्या कुटुंबात जन्मलेले नवनाथ चौधरी हे दहावीत पाच वेळा नापास झाले. घरची परिस्थिती जेमतेम असायची. शिक्षणाच्या फारशा सुविधा नसायच्या, आई-वडिलांना वाटायचे आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे. परंतु सुविधांचा आभाव होताच. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच म्हणजे धामणगाव येथे पूर्ण केले परंतु दहावीत असताना शाळेबरोबरच शेतातील कामे देखील करावी लागत होती. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. १९९७ दरम्यान मी दहावीची परिक्षा दिली. निकाल पत्र हातात पडले. मी नापास झालो होतो. प्रचंड वाईट वाटत होते. माझ्या बरोबरचे सगळे वर्ग मित्र पास झाले होते. नापास झालेला निकाल घरी घेवून आलो. तेव्हा वडिलांनाही मी नापास झाल्याचे दुख: झाले होते. शेजारी पाजारी तर माझी खिल्ली उडवत होते. ‘नवनाथ नापास झाला म्हणटल्यावर आता पुढे काहीच करू शकत नाही.’ अशा प्रतिक्रीया माझ्या समोर माझ्या वडिलांना सुनावत होते. मी १९७९ ते ८३ पर्यंत दहावीची परिक्षा देत होतो. पण माझ्या पदरी निराशाच पडत होती. माझ्या बरोबरचे माझे वर्गमित्र शिकून पुढे गेलेले पाहून मला माझा राग येत होता. मी अभ्यासाला सुरूवात केली. रात्रनदिवस अभ्यास करायचो. वेळ मिळेल तेव्हा पुस्तक घेवून बसायचो. १९८३ ला मी दहावीची परिक्षा दिली. माझे गेलेले सर्व विषय निघाले. मी सहाव्या प्रयत्नात पास झाल्यावर माझ्या आई-वडिलांना आनंद झाला होता. यानंतर मी ठरवले होते की, आता मागे वळून पहायचे नाही काहीही झाले तरी शिक्षणाची जिद्द सोडायची नाही. आपण नापास झाल्यावर शेजारी-पाजारी व नातेवाईकांनी केलेली चेष्टा याला मोठं होऊन उत्तर द्यायचं. ही खुनगाठ मनाशी बांधली. अन् दहावी नतंर च्या शिक्षणासाठी अहमदनगर गाठले. अहमदनगर येथील आर्टस कॉलेजमध्ये एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर आष्टी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजु झालो. २००२ मध्ये शाहीर विश्वास फाटे यांनी ‘व्यक्ती आणि वाङमय’ या विषयावर डॉ. सुदाम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट मिळवली. असल्याचे डॉ. नवनाथ चौधरी हे सांगतात. नापास झाले म्हणजे पुढे काहीच उरत नाही अशी भावना न ठेवता विद्यार्थ्यांनी जग जिंकण्याचे सामर्थ्य मिळवावे. असा संदेश यावेळी डॉ. नवनाथ चौधरी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना दिला.व्यंकटेश वैष्णव ल्ल बीडनापास असा शब्द नुसता कानावर पडला तरी देखील स्वत: ला सुसंस्कृत समजणारी मंडळी नाक मुरडते़ नापास झालं की, आता सगळं संपलं़़ पुढे काहीच उरत नाही़ असा समज करून घेणारे काही महाभाग समाजात पहायला मिळतात़ शेजारचा अथवा गल्लीतला एखादा पोरगा दहावी-बारावी नापास झाला तर त्याच्याकडे तुच्छतेने पाहिले जाते़ मात्र तुच्छतेने पाहिले जाणाऱ्या याच एककाळच्या पोरांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून यश मिळवलेले आहे़ नापासांकडे पाहून नाक मुरडणाऱ्या मंडळीच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे़ एखाद्याला शिक्षणात रस नसतो, याचा अर्थ असा होत नाही की तो जीवनात अपयशी ठरेल. याचे उत्तम उदाहरण बीड जिल्ह्यात आहे. सूज्ञ पालकांनी आपल्या मुलांमधील आवडीनिवडी ओळखून त्यांना हव्या त्या क्षेत्रात झेप घेण्यास सांगितले पाहिजे. बीड जिल्ह्यात दहावी, बारावीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता किंवा आत्महत्येसारखा मार्ग न अवलंबता जिद्द व चिकाटीच्या बळावर जग जिंकण्याचे सामर्थ्य ठेवण्यासाठी बळ मिळावे यासाठी बीड जिल्ह्यातील या नापासांच्या शाळेतील ‘सक्सेसफुल’ मोहऱ्यांच्या वाटचालीबद्दल आढावा घेतला आहे. १७ जून रोजी दहावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या हातात पडेल, अनेक विद्यार्थी यश संपादन करतील, परंतु ज्यांना अपयश आले आहे, त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने भरारी घ्यावी. हे बळ प्रत्येकाच्या पंखात यावे, यासाठीचा एक छोटासा प्रयत्न.पालकांनी आपल्या मुलांच्या माथी अवाढव्य अपेक्षा मारू नयेत. मुलांपेक्षा पालकांच्याच उड्या जास्त आहेत. आपल्या पाल्याकडून अपेक्षा करीत असताना त्याला काय वाटते? हे जाणून घेण्याचाही प्रयत्न प्रत्येक पालकाने केला पाहिजे. मार्क कमी पडले तर न रागवता ‘तु पुन्हा प्रयत्न कर’ असा सल्ला दिला पाहिजे. दहावीतील विद्यार्थ्यांना फारसं चांगल, वाईट कळत नाही. त्यामुळे अपयशाचे ही मुले खूप लवकर खचून जाऊ शकतात, याचे भान पालकांनी ठेवावे.- सविता राजेश विर्धे, पालकदहावी ‘फेल’ झाला कोट्यधीशसंजय तिपाले ल्ल बीडएकदा अपयश आले की, अनेकजण खचून जातात़ आता सारेच संपले़़़ अशीच काहीशी त्यांची भावना असते; परंतु अपयशाची धूळ झटकून जे धावतात ते एक दिवस ‘लक्ष्य’ गाठतातच़ बीड येथील तरुण व्यावसायिक अभय आब्बड हे त्यापैकीच एक़ दहावीत ‘फेल’ झाल्यावर अभय खचले नाहीत की उमेद हरवून बसले नाहीत़ ते अल्पशा भांडवलावर व्यवसायात उतरले़ आज ते यशस्वी उद्योजक आहेत़ बीड येथील अभय हिरालाल आब्बड हे सर्वसाधारण कुटुंबातील़ वडील हिरालाल यांचे पेठ बीड भागात किराणा दुकाऩ अभय यांचे शिक्षण बीडमध्येच एका खाजगी शाळेत झाले़ १९९३ मध्ये अभय आब्बड यांनी दहावीची परीक्षा दिली़ निकाल जाहीर झाला़ गुणपत्रक हाती पडले़ उत्तिर्ण होण्याचा पूर्ण विश्वास होता; परंतु नको तेच झाले़ अभय यांना ५३ टक्के गुण मिळाले; परंतु मराठी विषयात शुद्धलेखनातील चुकांमुळे ते २० गुणांवरच आडकले़ पहिली ते नववीपर्यंत उत्तिर्ण होत आलेले अभय दहावीतील अपयशाने सुरुवातीला थोडे नाराज झाले; परंतु यातून ते लगेचच सावरलेही़ त्यांनी वडिलांच्या किराणा दुकानात लक्ष घालण्यास सुरुवात केली़ त्यानंतर संपूर्ण व्यवसायाचा भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला़ किराणा दुकान बंद करुन त्यांनी सोन्या- चांदीचे दुकान सुरु केले; परंतु येथेही त्यांच्या वाट्याला अपयशच आले़ दागिन्यांच्या भावांतील अस्थिरता, कारागिरांची मजुरी अन् दुकानभाडे हे गणित काही जुळेचना़ शेवटी त्यांनी हा व्यवसायही थांबविला़ त्यानंतर त्यांनी आडत दुकान सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला़ कुटुंबियांनी हातावर फक्त ५० हजार ठेवले़ या पैशावर त्यांनी जालना येथे आडतचा व्यवसाय सुरु केला़ वर्षाकाठी तब्बल सात कोटीपर्यंत उलाढाल होते़ आडत सुरुवातीला भाड्याच्या जागेत होती़ ती स्वत:च्या जागेत आणल़ त्यानंतर अभय आब्बड यांनी आॅईलमिल सुरु केले़ या व्यवसायातही त्यांनी अल्पावधीत जम बसविला़ वर्षाकाठीचा ‘टर्नओव्हर’ सुमारे तीन कोटींच्या घरात आहे़ त्यांच्याकडे आडतमध्ये चार तर आॅईल मिलमध्ये १० कर्मचारी काम करतात़ या सर्वांना रोजगार देऊन त्यांचे संसार उभे करण्याचे महत्त्वाचे कामही आब्बड यांनी केले आहे़कु टुंबियांचे पाठबळ महत्त्वाचेदहावीत मी अनुत्तिर्ण झालो तेंव्हा मी देखील निराश झालो होतो; परंतु वडील हिरालाल आब्बड व आई पे्रमाबाई आब्बड यांनी ‘एवढ्यावरच सारे संपले का?’ असे सांगून मला समजून घेतले़ त्यांनी अवास्तव अपेक्षा न ठेवता मला व्यवसायात उतरण्याचा सल्ला दिला़ व्यवसायातील बारीक- सारीक बाबी शिकविल्या़ व्यवसायातही अनेकदा अडचणी आल्या; परंतु कुटुंबियांनी आधार दिल्यानेच मी त्यावर मात करु शकलो अशी प्रतिक्रिया अभय आब्बड यांनी दिली़जिद्द, चिकाटी आवश्यकमला आॅईल मिल, आडत हे दोन्ही व्यवसाय नवे होते़ जोखीम स्वीकारण्याची तयारी ठेवूनच मी व्यवसायात उतरलो़ भांडवलही कमी होते; पण मी जिद्द अन् चिकाटी सोडली नाही़ त्यामुळेच दोन्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकलो़ नकरात्मक विचारांना थारा न देता धाडस दाखवले तर यश मिळतेच असे अभय आब्बड म्हणतात़